राम मंदीर उभारणीसाठी अध्यादेश काढा : इक्बाल अन्सारी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Nov-2018
Total Views |


 

अयोध्या : राम मंदीर उभारणीच्या कायद्यासाठी मुस्लिम समाजाचे पक्षकार इक्बाल अन्सारी यांनी समर्थन केले आहे. सरकारने राम मंदीराच्या निर्मितीसाठी कायदा केल्यास आमचा आक्षेप नसेल, अशी प्रतिक्रीया त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. राम मंदिराचे पुजारी सत्येंद्र दास यांनी या वक्तव्याचे समर्थन केले आहे. यापूर्वी राम मंदीरप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाने तोडगा काढावा यासाठी आग्रही भूमिका अन्सारी यांनी मांडली होती.

 

अन्सारी म्हणाले, केंद्र सरकारने आता लवकरात लवकर दोन्ही सभागृहात विधेयक मांडून या प्रकरणी तोडगा काढावा. सरकारने कायदा केल्यास आमचा आक्षेप असणार नाही. आम्हीही त्या कायद्याचे पालन करू. भाजप सरकारने यावर तोडगा काढण्यासाठी वेळीच पावले ऊचलावीत.

 

सरकारबद्दल प्रतिक्रीया देताना ते म्हणाले, भाजप सरकारशीही आम्हाला कोणतीच अडचण नाही. सरकारच्या कामाबद्दल आम्ही आनंदी आहोत. मला केवळ त्या राजकारण्यांची अडचण आहे की जे केवळ राजकीय फायद्यासाठी अयोद्धेचा मुद्दा उचलून धरतात. इथे येऊन राजकारण करतात. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो.

 

यावर राम मंदिराचे पुजारी सत्येंद्र दास म्हणाले कि, अन्सारींच्या वक्तव्याचे स्वागत आहे. सरकारने कायदा करुन राम मंदिराची उभारणी करावी. त्यांचा हा प्रयत्न आणि भूमिका कौतूकास्पद आहे. त्यामुळे राम मंदिराचा प्रश्न निकाली लागेल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@