अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या तीन तरुणांविरोधात गुन्हा दाखल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Nov-2018
Total Views |
तळोदा  :- 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवुन पळवून नेत तिच्यावर अत्याचार करणार्‍या तीन तरुणांविरुध्द धडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
 
याबाबत पोलिस सुत्रांच्या माहितीनुसार धडगाव तालुक्यातील पाडली या गावातील 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवुन पळवुन नेण्यात आले.
 
या दरम्यान खर्डागाव, वरखेडीचा उतारपाडा या ठिकाणी व पुर्ण जिल्ह्यातील इंदापुर येथे मुलीला डांबुन ठेवत तिच्यावर बल्ताकार करण्यात आला आहे. 19 ऑक्टोंबर ते 18 नोव्हेंबर यां दरम्यान ही घटना घडली आहे.
 
याबाबत पिडीत अल्पवयीन मुलीले धडगाव पोलीस स्टेशन ला स्वत: फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अर्जुन भायजा वळवी, जोसा विनोद वळवी, विनोद विजया वळवी रा. खर्डा ता. धडगाव या तिघांविरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
@@AUTHORINFO_V1@@