मलेरिया रोखण्यासाठी ११६४० कोटींचा खर्च

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Nov-2018
Total Views |
 

नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या अहवालानुसार मलेरियाचे रुग्ण आढळलेल्या ११ देशांपैकी भारत हा एकमेव देश आहे, कि जो डासांच्या उत्पत्तीपासून होणारे आजार रोखण्यात यशस्वी झाला आहे. २०१७च्या तुलनेत मलेरियाच्या रुग्णांमध्ये घट झाली आहे.

 

एकूण जगाच्या तुलनेत भारतातील मलेरिया झालेल्या रुग्णांची संख्या कमी आहे. मलेरिया रोखण्यासाठी सरकार सुमारे ११ हजार ६४० कोटींचा खर्च करत असल्याची आकडेवारी उघड झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या २०१६च्या अहवालानुसार, भारतात मलेरियाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण २४ टक्क्यांनी कमी झाले आहे.

 
 

मलेरियावर मात करण्यात ओडीशा हे राज्य आघाडीवर आहे. राज्यपातळीवर मिळालेल्या आकडेवारीनुसार, या भागात सुमारे ४० टक्क्यांनी रुग्ण कमी झाले आहेत. भारत सरकारने सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियान आणि विविध जनकल्याण आरोग्य योजनेमुळे डासांची उत्पत्ती रोखणे आणि मलेरियाशी लढण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी केल्याचे हे यश ही कारणे आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@