जगातील पहिला फोल्डेबल फोन लाँच

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Nov-2018
Total Views |


 


 

कॅलिफोर्निया: वाचून बसला ना धक्का? जगात मोबाइल उत्क्रांतीत नवनवीन आयाम रचले जात आहेत. जगाची अशीच एक उत्क्रांती म्हणजे 'रोयोले' कंपनीचा जगातला पहिला दुमडणारा स्मार्टफोन 'रोयोले फ्लेक्सपाय' (Royole Flexpai). दोन वर्षांपूर्वी सॅमसंगने दुमडणारा फोन बनवत असल्याची माहिती दिली होती. मात्र त्याआधी रोयोले कंपनीने त्याआधीच हा स्मार्टफोन बाजारात आणला आहे.

 

'फ्लेक्सपाय' हा फोन दिसायला टॅब्लेटसारखा आहे. कारण या फोनला ७.८ इंचाची स्क्रीन दिली आहे. ही स्क्रीन दुमडल्यानंतर ४ इंचाची होते. या फोनमध्ये वापरला जाणारा स्नॅपड्रॅगन ८१५० हा प्रोसेसरही जगातला पहिलाच प्रोसेसर आहे. याशिवाय कंपनीने मोबाईल चार्जिंगसाठी आरओ तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. या द्वारे बॅटरी ० ते ८० टक्के केवळ तासाभरात चार्ज होते.

 
 
 
 
 

विशेष म्हणजे ३-४ कॅमेरा देण्याची स्पर्धा चालू असताना या फोनमध्ये केवळ एकच कॅमेरा आहे. तोही २० मेगापिक्सल. या फोनमध्ये ६ जीबी रॅम तर १२८ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅम तर २५६ जीबी व ५१२ जीबी स्टोरेज असेल. याची किमंतही कमी असेल असे कंपनीकडून सांगण्यात येत आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@