दिवाळीसाठी अतिरिक्त बसेसचे नियोजन करावे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Nov-2018
Total Views |
जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांचे निर्देश
 
नंदुरबार - दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खासगी ट्रॅव्हल्स संचालक ग्राहकांकडून माफक दर आकारतील, यासाठी उपपरिवहन अधिकार्‍यांनी लक्ष घालावे. तसेच एसटी महामंडळाने पुणे व मुंबईसाठी अतिरिक्त निमआराम बसेस, शिवशाही बसेस सोडाव्या, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिले.
 
 
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी उपप्रादेशिक परिवहन विभागाचे नानासाहेब बच्छाव, एसटी आगारप्रमुख नीलेश गावीत, भाजपचे नगरसेवक चारुदत्त कळवणकर, प्रशांत चौधरी, संजय शाह व केतन रघुवंशी उपस्थित होते.
 
 
केतन रघुवंशी यांनी खासगी बसेसच्या विरोधात बैठकीत तक्रार केली. खासगी ट्रॅव्हल्सचे संचालक नेहमीच दिवाळीच्या गर्दीचा फायदा उचलत प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा पैसा वसूल करतात. तसेच कायद्याची पायमल्ली करतात. यावर उपप्रादेशिक परिवहन खात्याचे बच्छाव म्हणाले, या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल.
 
 
तसेच बेकायदेशीर भाडेवाढ आकारणी करणार्‍यांवर निश्चितपणे कारवाई करून समज देण्यात येईल. पुणे व मुंबई या शहरासाठी शहादा व नंदुरबार आगारातून अतिरिक्त शिवशाही बससेवा सुरू करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.या बैठकीत धुळे विभागाच्या अधिकार्‍यांशी बोलून पुणे व मुंबई जाण्यासाठी आरामदायी बसेस सुरू करण्याच्या सूचना करण्यात आल्या.
@@AUTHORINFO_V1@@