चोरीचा ट्रक खामगावला पकडला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Nov-2018
Total Views |
एमआयडीसी पोलिसांची कारवाई, दोघांना न्यायालयीन कोठडी

 
जळगाव, 1 नोव्हेेंबर
 
सुप्रीम कॉलनीतील गुलाम मुस्तफा कादर यांच्या भंगारच्या गोडावूनसमोरील रस्त्यावरून 25 ते 26 ऑक्टोबरदरम्यान ट्रक गहाळ झाला होता. तो ट्रक अकोला बायपासजवळ, खामगाव येथे 31 ऑक्टोबर रोजी पोलिसांना आढळून आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
 
 
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून, फहीम हमीद झारे, रा.झारा मोहल्ला, नेरी दिगर, ता.जामनेर यांच्या मालकीचा ट्रक (क्र.एमएच 04, एफडी 2013) सुप्रीम कॉलनीतून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 
गुन्ह्याच्या तपासात पोलीस निरीक्षक अनिरुद्ध अढाव यांना याबाबत माहिती मिळाली. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे, पोलीस निरीक्षक अनिरुद्ध अढाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विशाल वाठोरे, सहा. फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, पोना सचिन मुंढे, पोकाँ निलेश पाटील यांच्या पथकाने सापळा रचून अकोला बायपासजवळ, खामगाव येथे उभा असलेला ट्रक जप्त केला.
 
 
दरम्यान, शेख सुसुफ उर्फ बबल्या शेख मुसा, रा.तांबापुरा, मेहरुण साथीदार हिरा लक्ष्मीनारायण तल्हार, रा.बाळापूर, ता. खामगाव यांना रात्री अटक केली. दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायमूर्ती सिंदाडे यांनी त्यांना न्यायालयीन कोठडी दिली आहे.
तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे, पोलीस निरीक्षक अनिरुद्ध अढाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विशाल वाठोरे हे करीत आहेत.
@@AUTHORINFO_V1@@