तळोदा शहराच्या प्रवेशद्वाराला शिवाजी महाराज यांचे नाव द्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Nov-2018
Total Views |

 
 
 
तळोदा - तळोदा शहरातील फॉरेस्ट नाका येथे नवीन उभारत असलेल्या शहराच्या प्रवेशव्दाराला हिंदवी स्वराज्य संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशव्दार असे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी शहरातील शिवप्रेमींतर्फे आज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जनार्दन पवार यांना निवेदन देण्यात आले.
 
 
सदर निवेदनात म्हटले आहे की, महापुरुष एका जातीचे नसतात, मानवी कल्याणासाठी सर्व भेदरेषा भेदून काम करतात म्हणून ते महापुरूष ठरतात. छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचे तसेच अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत, सर्व जातीचे-धर्माचे प्रेरणास्थान आहेत.
 
 
मध्ययुगीन भारताच्या इतिहासात समता, बंधुता आणि सामाजिक न्यायावर आधारित राजेशाहीत लोकशाही निर्माण करणारा हा राजा जगभरातील प्रतिभावंतांचा प्रेरणास्त्रोत आहे. भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात त्यांच्या कर्तृत्वाचा आदर्श घेतला जातो. त्यांच्या नेत्रदीपक कर्तृत्वाचा ठसा जनसामान्यात रुजविण्यासाठी, तसेच त्यांचे शौर्याने वेळोवेळी समाजामध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी शहराच्या प्रवेशव्दाराला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देणे गरजेचे आहे.
 
 
हे प्रवेशव्दार समाजाला शौर्याची, नवचैतन्याची प्रेरणा देईल, याने समाजात सामाजिक सलोखा निर्माण होईल. यामुळे शहरातील फॉरेस्ट नाका येथे नवीन उभारत असलेल्या शहाराच्या प्रवेशव्दाराला हिंदवी स्वराज्य संस्थापक, छत्रपती श्री शिवाजी महाराज प्रवेशव्दार असे नाव देण्यात यावे.
 
 
 
सदर निवेदनावर श्रीशिव प्रतिष्ठानचे युवराज चौधरी, किरण ठाकरे, पराग राणे, जगदीश परदेशी, दीपक चौधरी, शिवम सोनार, कृष्णा सोनार, कार्तिक शिंदे, सचिन भोई, स्वप्निल चौधरी, निखिल आघाडे, कुणाल ठाकरे, मेहुल पिंपरे, भरत वाडीले, सौरभ कलाल, राहुल जैन, हर्षल चौधरी, तुषार जोहरी, आदी शिवप्रेमींच्या सह्या आहेत.
@@AUTHORINFO_V1@@