वाढदिवसानिमित्त मातोश्री वृद्धाश्रमात फळवाटप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Nov-2018
Total Views |
 
 

जळगाव, 1 नोव्हेंबर
 
शहरातील अनेक नेतेमंडळी, राजकीय कार्यकर्त्यांचे वाढदिवस म्हणजे श्रीमंतीचे ओंगळवाणे दर्शन असते. त्यांचा वाढदिवस मध्यरात्री तासभर मोठ्या आवाजाचे फटाका बॉम्ब फोडूनच सुरू होतो.असे चित्र एका बाजूला दिसत असतानाच तालुक्यातील नंदगाव येथील मुक्तपत्रकार असलेले व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जळगाव तालुका कार्याध्यक्ष स्वप्निल शांताराम सोनवणे यांनी आपल्या वाढदिवसाला मातोश्री वृद्धाश्रमात फळवाटप करत जुनी नवी पिढी जपण्याचे काम केले.
 
 
स्वप्निल सोनवणे यांनी आपल्या जन्मदिनाचे औचित्य साधत सामाजिकतेची जाण राखून आपले वडील तथा जळगाव जिल्हा मार्केटिंगचे संचालक शांताराम सोनवणे यांच्या मार्गदर्शनात शहरातील सावखेडा शिवारातील मातोश्री वृद्धाश्रमात जाऊन फळवाटप केले व आपला जन्मदिवस साजरा केला.
 
 
यावेळी सोनवणे यांनी वृद्धाश्रमातील सर्व निराधार वृद्धांसोबत संवाद साधला.अनेक बाबतीत त्यांचे सल्लेही घेतले व सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन फळवाटप केले. येथील निराधार वृद्धांनी ‘आमची मुले नसली अथवा ते आमचा सांभाळ करीत नसले तरी तुझ्यासारखे नातू आमच्याकडे असल्याचे’ भावनिक प्रतिपादन यावेळी केले.सोनवणे यांच्या या फळवाटपाच्या कार्यक्रमामुळे वृद्धाश्रमातील सर्वच वृद्धांच्या चेहर्‍यावर भावनिक आनंद दिसून आला.
 
 
वाढदिवस आला की प्रत्येकजण आपल्या ‘श्रीमंत’ मित्रांवर पैसे उधळतात. त्यांना जंगी पार्टी देतात. मात्र, आनंद कुणास द्यावा व पैसे कुणावर उधळावे, याचे अगदी सुरेख उदाहरण सोनवणे यांनी दाखवून दिले. वाढदिवसानिमित्त वेगवेगळ्या माध्यमातून अनावश्यक खर्च न करता गरिबांसाठी त्यांनी या प्रेरणादायी उपक्रमाने आजच्या युवापिढीसमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
 
 
सोनवणे यांच्या वाढदिवसाच्या आदर्शवत उपक्रमात त्यांचे मित्र उज्ज्वल पाटील, विशाल चव्हाण, प्रितम जोहरे, प्रशांत जोशी, अविनाश सोनवणे व अभिजित सपकाळे आदींनी सहकार्य केले. यावेळी मातोश्री वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापिका छाया पाठक यांची उपस्थिती लाभली. यशस्वितेसाठी सोनवणे यांच्या आई तथा माजी ग्रा.पं.सदस्या रजनी सोनवणे व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जळगाव जिल्हाध्यक्ष प्रवीण सपकाळे यांचेही मार्गदर्शन लाभले.
 
@@AUTHORINFO_V1@@