कमी पर्जन्यमानाच्या २५० महसुली मंडळातराज्याच्या तिजोरीतून मदत : चंद्रकांतदादा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Nov-2018
Total Views |

 
 
मुंबई, 1 नोव्हेंबर : राज्यातील 151 तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केल्यानंतरही काही तालुक्यांमध्ये पाऊस कमी झाल्याने दुष्काळाची परिस्थिती आहे. अशा तालुक्यांना दुष्काळाची मदत देता यावी, यासाठी ज्या महसुली मंडळांमध्ये 750 मिमीपेक्षा कमी व सरासरीपेक्षा 75 टक्के कमी पाऊस झाला असेल,
 
अशा 250 मंडळांमध्ये दुष्काळाची मदत राज्याच्या तिजोरीतून देण्यात येईल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मंत्रालयातील दालनात पत्रकारांशी संवाद साधतांना दिली.
 
शासनाने बुधवार (31 ऑक्टोबर) रोजी केंद्र सरकारच्या निकषान्वये राज्यातील 151 तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले. पण यातील काही तालुक्यांमध्ये कमी पाऊस झाल्याने दुष्काळाची तीव्रता अधिक आहे;
 
 
पण त्यांचा समावेश दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत झाला नव्हता. त्यांनाही दुष्काळी मदत मिळावी; यासाठी मंडलाचा निकष निश्चित करुन, राज्यातील ज्या मंडळांमध्ये 750 मिमीपेक्षा कमी व सरासरी पेक्षा 75 टक्के कमी
पाऊस
@@AUTHORINFO_V1@@