सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Nov-2018
Total Views |
सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन
 

जळगाव, 1 नोव्हेंबर- अखिल भारतीय लेवा विकास महासंघ, सरदार वल्लभभाई पटेल बहुउद्देशीय विकास संस्था आणि युवा विकास फाउंडेशन यांच्यातर्फे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 143 व्या जयंतीनिमित्त लेवा भवनात माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
 
 
यावेळी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, आ. सुरेश भोळे, महापौर सीमा भोळे, रेमंडचे कार्यकारी संचालक अनिल नारखेडे, काँग्रेसचे महानगराध्यक्ष डॉ. ए. जी. भंगाळे, माजी महापौर नितीन लढ्ढा, ललित कोल्हे, जळगाव जिल्हा केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष सुनील भंगाळे, अखिल भारतीय लेवा विकास महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष तथा माजी महापौर विष्णू भंगाळे, जे.डी.सी.सी.बँकेचे एमडी जितेंद्र देशमुख, दिलीप तिवारी, नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे, शोभा चौधरी, सरिता माळी, जनता शिक्षण मंडळाचे सचिव प्रभाव चौधरी, नगरसेवक अनंत जोशी, किरण बेंडाळे, अ.भा.लेवा विकास महासंघाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. स्नेहल फेगडे, ललितभैया चौधरी, ग. स. सोसायटीचे माजी उपाध्यक्ष महेश पाटील, प्रा.सुरेश अत्तरदे यांच्यासह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, समाजबांधव, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
 
प्राथ.विद्यामंदिर, जिजाऊमाता, रमाई फाउंडेशन
मेहरूण येथील आई जिजाऊमाता, रमाई फाउंडेशन कार्यालयात उपाध्यक्ष चंद्रकांत शिरसाठ यांच्या हस्ते लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला मार्ल्यापण करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे रामदास सपकाळे होते. मान्यवरांनी सरदार पटेल यांच्याबाबत आपले विचार मांडून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
 
 
यशस्वितेसाठी निलेश सपकाळे, संजय अहिरे, रामलाल पवार, सचिव पाटील, पी.व्ही.पाटील, अमित सोनवणे, रुपाली पवार, मनीषा पाटील, दिलीप नेटके, नरेंद्र सुरकळे, अल्ताफ पठाण, ईश्वर अहिरे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सोनाली सपकाळे यांनी तर आभार ईश्वर ढिपरे यांनी मानले.
 
 
बालाजी फाउंडेशन येथील बालाजी फाउंडेशनतर्फे सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात आली. फाउंडेशनचे अध्यक्ष अ‍ॅड. पद्माकर जैन यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. संस्थेचे कार्यकारी सभासद अ‍ॅड.विजय दर्जी, नंदा दर्जी, शंतनू सोनवणे, निलेश जाधव, धनंजय गोळे, ओंकार कोंडाळकर, भाग्यश्री वाणी यांनी आपले विचार मांडले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
जळगाव - राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाच्या वतीने तसेच जिल्हाध्यक्ष महानगर व जिल्हाध्यक्ष सेवादल यांच्यातर्फे योगपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आणि स्व. इंदिरा गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रविंद्रभैय्या पाटील, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, कार्याध्यक्ष विलाल भाऊसाहेब, महानगर जिल्हाध्यक्ष नामदेवराव चौधरी, जिल्हा समन्वयक विकास पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
 
प्रास्ताविक सेवादलाचे जिल्हाध्यक्ष वाय.एस.महाजन यांनी केले. यावेळी योगेश देसले, सलीम इनामदार, जयप्रकाश महाडिक, रवींद्र मोरे, अभिषेक पाटील, अ‍ॅड. राजेश गोयर, महिला आघाडीच्या मंगला पाटील, लता मोरे, कल्पिता पाटील, प्रतिभा शिरसाठ, मिनल पाटील, निला चौधरी यांच्यासह अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू-भगिनी उपस्थित होते.
निमखेडी शिवार
युवा विकास फाउंडेशन संचालित प्राथमिक विद्यामंदिरात सरदार वल्लभभाई पटेल जयंती आणि राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला.
 
सरदार पटेल यांच्या प्रतिमेला उपशिक्षक भारंबे यांनी पुष्पहार अर्पण केले तसेच विद्यार्थी आणि शिक्षकांनी राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेतली. सूत्रसंचालन दीपनंदा पाटील यांनी केेले. यशस्वितेसाठी दीपक भारंबे, सारिका सरोदे यांनी परिश्रम घेतले.
@@AUTHORINFO_V1@@