चाळीसगाव तालुक्यासाठी गिरणा धरणून आवर्तन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Nov-2018
Total Views |

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

 
जळगाव, २ नोव्हेंबर
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी चाळीसगाव तालुक्यातील खरजाई व तरवाडे या गावांना भेट देऊन दुष्काळी स्थितीची पाहणी केली. चाळीसगाव तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी येत्या तीन दिवसात गिरणा धरणातून पाण्याचे आर्वतन सोडण्यात येणार असल्याची माहिती यावेळी पालकमंत्र्यांनी दिली.
 
 
चाळीसगाव तालुक्यातील खरजाई, तरवाडे, ओझर या गावाची पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र विहीरीचे नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. बोंडअळीमुळे कपाशीचे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकर्‍यांना शासनाने ३ हजार ३०० कोटी रूपयांची भरपाई आतापर्यंत दिली असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
 
 
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भडगाव तालुक्यातील तांदलवाडी येथे भेट देऊन पीक परिस्थितीची पाहणी केली.जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रंशात सोनवणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार, गटविकास अधिकारी आदी उपस्थित होते.
 
 
@@AUTHORINFO_V1@@