निर्दयीपणे कोंबलेल्या पाच गुरांची पोलिसांद्वारे सुटका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Nov-2018
Total Views |
जळगाव, 1 नोव्हेंबर
 
अवैधरीत्या कत्तलीसाठी जामनेरकडे जाणार्‍या छोटा हत्ती (क्र.एमएच 19, बीएम 8188) या गाडीला एमआयडीसी पोलिसांनी कुसुंबा नाका येथे 30 रोजी रात्री 12.30 दरम्यान अडविले. त्यातील निर्दयीपणे कोंबलेल्या पाच गुरांची पोलिसांनी सुटका केली. यावेळी गुरांची वाहतूक करणार्‍या दोन जणांना अटक केली आहे.
 
 
पोलीस निरीक्षक अनिरुद्ध आढाव यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन स.फौ.अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, पोहेकाँ जितेंद्र राजपूत, पोकाँ सचिन पाटील, निलेश पाटील, असीम तडवी यांनी ही कारवाई केली.
 
 
कारवाईत 50 हजार किंमतीचे पाच बैल आणि 70 हजार किमतीची मालवाहू गाडी असा एकूण 1 लाख 20 हजारांचा मुद्देमाल मिळून आला. बैलांना कुसुंबा गोशाळेत रवाना करण्यात आले आहे.
 
 
पोकाँ निलेश पाटील यांच्या फिर्यादीवरून चालक नदीम खान समद खान (वय 23, रा. शिवाजीनगर, हुडको) आणि यासीन मज्जीत सय्यद (वय 58, रा.17 नंबर शाळेजवळ, बळीराम पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
@@AUTHORINFO_V1@@