बेस्ट कर्मचार्‍यांना बोनस जाहीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Nov-2018
Total Views |


पगारातून कपात होणार नाही


मुंबई : नुकताच मुंबई महानगर पालिकेच्या कर्मचार्‍यांना दिवाळी बोनस जाहीर केल्यानंतर आता बेस्ट कर्मचाऱ्यांनाही ५५०० रुपये बोनस जाहीर करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे यंदा पगारातून बोनस कपात केला जाणार नसल्याचे देखील जाहीर करण्यात आले. गेल्यावर्षी बेस्ट कर्मचार्‍यांना साडेपाच हजार रुपये बोनस देण्यात आला होता परंतु नंतर पगारातून हा बोनस वसूल करण्यात आला होता.

 

बेस्ट कर्मचार्‍यांच्याही घरात दिवाळी साजरी व्हायला हवी. बेस्ट आर्थिक संकटात आहे त्यामुळे महापालिकेने कर्मचार्‍यांना ५ हजार रुपये बोनस द्यावा परंतु बोनस पगारातून वसूल करू नये अशी मागणी सोमवारी बेस्ट समितीचे अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांनी गटनेत्यांच्या बैठकीत आयुक्तांकडे केली केली होती. त्यानंतर हा बोनस जाहीर करण्यात आला आहे.

 

बेस्टने कर्मचाऱ्यांना बोनस देण्यासाठी गेल्यावर्षी पालिका प्रशासनाने बेस्टला २१.६४ कोटी रुपयांची आगाऊ रक्कम दिली होती. त्यामुळे बेस्टने कर्मचाऱ्यांना साडेपाच हजार रुपये बोनस मिळाला होता. मात्र रक्कम देताना पालिका प्रशासनाने सुचवलेल्या सुधारणांची प्रक्रिया सुरू केल्यास ही रक्कम सानुग्रह अनुदान म्हणून गणली जाईल अन्यथा ही रक्कम अधिकारी व कर्मचार्‍यांच्या पगारातून ११ हफ्त्यात वसूल केली जाईल, अशी अट पालिका आयुक्तांनी त्यावेळी घातली होती. त्यानुसार हा बोनस वसूल करण्यात आला होता. मात्र यावर्षी मिळालेला बोनस कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापला जाणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@