ओमनीतून लांबवली ६० हजारांची हॅण्डबॅग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Nov-2018
Total Views |
भरदिवसा चारचाकीतून धाडसी चोरी
गणेश कॉलनीतील प्रकार, सीसीटीव्हीमध्ये चोरटा कैद
 
 
 

जळगाव, 1 नोव्हेेंबर
गणेश कॉलनी चौकातील शंकरलाल रतनलाल ऑटो पंपावर गॅस भरण्यासाठी आलेले ठिबक नळ्यांच्या व्यापार्‍याच्या मारुती ओमनीतून चोरट्याने भरदिवसा 60 हजारांची हॅण्डबॅगलांबवली. ही घटना गुरुवारी दुपारी 12.45 ते 1.25 दरम्यान घडली. सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाली असून चोरट्याचा शोध सुरू आहे.
 
 
खेडी भोकरी, ता.चोपडा येथील रणछोड सुभाष पाटील हे जळगावला ठिबकच्या नळ्या घेण्यासाठी गुरुवारी जळगाव आले होते. शहरातील पंजाब नॅशनल बँकेतून त्यांनी 40 हजार आणि 20 हजार असे एकूण 60 हजार रुपये हॅण्डबॅगमध्ये घेऊन ओमनी कारने (क्र. एमएच 19 सीयू 4616) ऑटो पंपावर गॅस भरण्यासाठी थांबले.
 
दरम्यान, पाटील हे वाहनाच्या खाली उतरले असता, गाडीचे बोनेट उघडून पंपावरील कर्मचार्‍याला गॅस टाकीचे झाकण उघडून देऊन दोन हजारांचा गॅस भरला. कर्मचार्‍याला पैसे देण्यासाठी गाडीचे बोनेट बंद करून ते ड्रायव्हर साईडला आले असता गाडीतील काळ्या रंगाची हॅण्डबॅग दिसून आली नाही.याबाबत जिल्हापेठ ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोर्‍यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
 
 
अन् हॅण्डबॅग गायब
 
ऑटो पंपावर गॅस भरल्यानंतर पैसे देण्यासाठी गाडीकडे पाटील गेले असता. काही मिनिटांतच चोरट्याने हॅण्डबॅग लांबविली. चोरटा मोबाईल बोलण्याच्या बहाण्याने गाडीभोवती फिरत होता. त्याने पांढर्‍या रंगाचा शर्ट परिधान केलेला होता, असे पाटील यांनी सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@