निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘व्हॉट्सअप’ झाले ‘अलर्ट’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Nov-2018
Total Views |
 
 

नवी दिल्ली देशात सध्या राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आदी राज्यांमध्ये निवडणुकांचा असून त्या पार्श्वभूमीवर बदनामीकारक, आक्षेपार्ह मजकूर, खोट्या बातम्या आणि अफवांना रोखण्यासाठी व्हॉटसअपनेही कंबर कसली आहे. राजस्थानमध्ये अफवा रोखण्यासाठी व्हॉटसअप इनकोर्पोरेशनतर्फे प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येत आहे.

 

व्हॉटस्अप आणि डिजिटल एम्पावरमेंट फाऊंडेशनच्या सहाय्याने देशातील 10 राज्यांमध्ये हा कार्यक्रम सुरू केला जाणार आहे. बहुतांश युझर्स मेसेजची खात्री करता फॉरवर्ड करतात. यामुळेच मोठ्या प्रमाणावर फेक न्यूज आणि अफवांचा पाऊस सुरू होतो. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अशा घटना रोखण्यासाठी मार्च 2019 पर्यंत हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. जबाबदार वापरकर्ता म्हणून एखादा मेसेज पुढे पाठवण्यापूर्वी काय काळजी घ्यावी, याची माहीती यावेळी दिली जाणार आहे. पुढच्या वर्षापर्यंत व्हॉटसअपतर्फे महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, आसाम, त्रिपुरा, झारखंड आदी राज्यांमध्येही प्रशिक्षण शिबिरे सुरू करणार आहेत.

 

व्हॉटसअपचे धोरण व्यवस्थापक बेन सपल यांनी दिलेल्या माहीतीनुसार, व्हॉटसअप वापरकर्त्यांना दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणामागे अफवा रोखणे हा उद्देश आहे. त्यासाठी महाविद्यालये, स्थानिक प्रशासन संस्था, राजकीय नेते मंडळी आणि सामाजिक संस्थांची मदत घेतली जाणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@