पंतप्रधानांची हरियाणाला खास भेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Nov-2018
Total Views |


 


नवी दिल्ली : सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कुंडली-मानेसर-पलवल (केएमपी) या महामार्गाचे उदघाटन करण्यात आले. याच सोबत बल्लभगड- मुजेसार या मेट्रो लिंकचेही उदघाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. "या महामार्गामुळे दिल्लीतील प्रदूषणाला आळा बसेल असे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले. त्यांच्या सोबत हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टरदेखील उपस्तित होते. यावेळीही त्यांनी काँग्रेसच्या कामकाजावर निशाणा साधला.

 

पंतप्रधान मोदी हे काँग्रेसवर निशाणा साधत म्हणाले कि, " हा प्रकल्प १२ वर्ष जुना आहे. याची सुरुवात केली तेव्हा या प्रकल्पाची किंमत १२०० कोटी होती आता मात्र याची किंमत तिप्पट झाली आहे. या महामार्गामुळे दिल्ली आणि हरियाणामधील वाहतूक कोंडी कमी होईल. जाड वाहनांची या महामार्गामुळे चांगली सोय होणार आहे. यामुळे दिल्लीतील प्रदूषण देखील कमी होईल." पुढे ते म्हणाले कि, " हरियाणातील बल्लभगडसुद्धा मेट्रोच्या नकाश्यावर येत आहे. या मुले वेळ आणि पैसे दोन्ही वाचतील. यासर्व गोष्टींचा फायदा अर्थव्यवस्था, पर्यावरण, पर्यटन आणि राहणीमानाला होईल."

 

मोदींनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडत सांगितले कि, " राष्ट्रकुल स्पर्धांच्यावेळी हा महामार्ग लोकांना वापरता येईल असे ध्येयसमोर ठेवून या महामार्गाची निर्मिती सुरू करण्यात आली होती. पण राष्ट्रकुल स्पर्धांची ज्याप्रकारे दुर्दशा झाली तशीच या रस्त्याची दुर्दशा झाली. काँग्रेसच्या या कामे आतंकवाने, लटकावणे आणि भटकावण्याच्या संस्कृतीमुळे देशाचे खूप नुकसान झाले आहे. जर दिलेल्या वेळेत हे काम पूर्ण झाले असते तर दिल्लीतील ट्रॅफिकचे चित्र सध्या वेगळे असते."

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@