भारतीय संघ ऑस्ट्रेलियाशी झुंजणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Nov-2018
Total Views |



ब्रिस्बेन : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया म्हणजे क्रिकेट रसिकांसाठी एक पर्वणीच असते. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची कामगिरी कशी असेल याची चिंता सर्वांचा लागली आहे. जाणकारांच्या मते हा दौरा म्हणजे २०१९च्या विश्वचषकाचे पूर्व तयारी आहे असे सांगण्यात येत आहे. या दौऱ्यातील पहिला टी-२० सामना २१ नोव्हेंबरला ब्रिस्बेन इथे होणार आहे.

 

'ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्ट्यांवर खेळणे तेवढे सोपे नाही. शिवाय ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना ते उंचपुरे असल्याचा फायदाच होईल. या गोलंदाजांचा मुकाबला करणे आमच्या फलंदाजांना कठीण जाईल. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौरा आमच्यासाठी तसा परीक्षा घेणाराच असेल. मात्र आम्हीही या आव्हानाला स्वीकारण्यास सज्ज आहोत,' असे भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्माने सांगितले. भारताने आतापर्यंत ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकलेली नाही. तीन कसोटी मालिका अनिर्णित राहिल्या आहेत, तर आठ मालिकांमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

 

वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात रोहितने केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे सर्वांचे लक्ष रोहित शर्माच्या फलंदाजीकडे असेल. "रोहित शर्माची फलंदाजी वाखणण्याजोगी असून, तो सहजरित्या चेंडूंचा सामना करतो. रोहितच्या खास शैलीमुळे अन्य फलंदाजांच्या तुलनेत त्याच्याकडे फटका मारण्यासाठी अतिरिक्त वेळ राहतो. रोहितला खेळताना बघणे सुखद अनुभव देणारे असते. वेगवान आणि फिरकीपटूंना तो समान पद्धतीने खेळतो," या शब्दांत मॅक्सवेलने रोहितचे कौतूक केले होते.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@