प्रांताधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Nov-2018
Total Views |
शहादा
कोळदा ते खेतिया दरम्यान सुरू असलेला रस्त्याच्या कामासाठी भूसंपादित करण्यात आलेल्या शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर याना दिले.
 
कोळदा ,प्रकाशा ,शहादा ,खेतिया राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरणाचे काम गेल्या चार ते पाच महिन्यापासून सुरू आहे. यासाठी शेतकऱ्यांना २७ एप्रिल २०१८ रोजी शेत जमीन संपादन करण्यात येणार असल्याची कल्पना प्रशासनाकडून दिली होती.
 
दिनांक ३० एप्रिल २०१८ पर्यंत आक्षेप नोंदविण्यासाठी पत्र मागविण्यात आले होते . शेतकऱ्यांनी वकिलांमार्फत कार्यालयात जाऊन दिनांक १६ ऑक्टोंबर २०१८ रोजी सामूहिक रित्या आक्षेप नोंदवत काम बंद करावे अश्या आशयाचे निवेदन दिले होते.
 मोर्चेकरी शेतकरी यांनी पुन्हा प्रांताधिकारी यांना आज निवेदन दिले.
 
निवेदनात नमुद करण्यात आले आहे की संपादित केलेली जमीन आम्हाला विश्वासात न घेता संपादित करण्यात आली असून त्याचा मोबदला आज पावेतो आम्हाला मिळालेल्या नाही.
 
प्रकाशा जवळ सुरू असलेले नवीन पुलाचे काम यात देखील जमीन मोठ्या प्रमाणात संपादित होणार आहे. शिवाय काम करत असताना ठेकेदार आम्हाला विश्वासात न घेता शेतातील बांबू उखडवून फेकून दिले. तर असलेली माती पुलाचा व रस्त्याचा कामाला वापरली.
 
आम्ही ठेकेदाराकडून रस्ता बनविण्याचा नकाशा मागतो तरी तो ही मिळत नाही. या अगोदर जो जुना पुल बनविण्यात आला होता तो देखील आमच्याच शेतजमिनीतून गेला त्यावेळी देखील विचारात घेतले गेले नाही.
 
 
निवेदनात शेतकऱ्यांनी मागणी केली आहे की आम्हाला विश्वासात घेवून प्रशासनाने काम करावें व आम्हाला आमच्या संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला द्यावा ,आम्हाला न्याय मिळवून द्यावा.नाहीतर आमची मुल बाळ रस्त्यावर येतील व संसार उघडे पडतील .
 
निवेदनावर छोटूलाल एकनाथ पाटील , स्वप्निल रवींद्र पाटील, मुकुंद मधुकर पाटील, भगवान रोहिदास पाटील, भीमराव पाटील, भटू दुल्लभ पाटील, देविदास जगन्नाथ पाटील, वासुदेव शंकर पाटील, रामनाथ जगन्नाथ पाटील, पुरुषोत्तम काशिनाथ पाटील, नरसई बाबुलाल पाटील, वासुदेव शंकर पाटील, प्रभाकर मंगेश पाटील, विश्वास श्रीकृष्ण पाटील, सुभाष नथ्‍थु पाटील, छोटुलाल नथु पाटील, बिपीन देवीदास पाटील, यशवंत लक्ष्‍मण पाटील, आदी भूसंपादीत शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.
 
@@AUTHORINFO_V1@@