अमृतसर हल्ल्यात ‘पाक’ कनेक्शन !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Nov-2018
Total Views |
 

अमृतसर : राजासांसी येथे निरंकारी भवनावर रविवारी करण्यात आलेल्या ग्रेनेड हल्ल्याच्या तपासादरम्यान धक्कादायक माहीती उघड होत आहे. गुरखाधारी हल्लेखोरांनी वापरलेले हॅण्डग्रेनेट हे पाकीस्तानी सैन्याकडून वापरण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. रविवारी अमृतसरच्या निरंकारी भवनात सत्संगमध्ये केलेल्या हल्ल्यात ३ जण मृत्यूमुखी पडले होते तर १५ जण जखमी झाले होते.

 

या हल्ल्यात वापरले जाणारे हॅंण्ड ग्रेनेड एचई-३६ या प्रकारात मोडते. पाकिस्तानकडून असे ग्रेनेड वापरले जाते. याच्या हल्ल्यात सुरुवातीला धूर पसरल्यानंतर स्पोट होतो. या स्फोटासाठी युएई आणि आयएसआयची मदत घेतल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाबमध्ये कुख्यात दहशतवादी झाकीर मुसा दिसल्याचा संशय व्यक्त केला जात असून पंजाब पोलिसांनी त्यानुसार बंदोबस्त कडक केला आहे. अमृतसहच्या गुरदासपुर आणि दीनानगर भागातील पोलिस चौक्यांच्या हद्दीत मुसाचे पोस्टर चिकटवण्यात आले आहेत.


 

या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी बैठक बोलावली असून यात रॉ आणि इन्टेलिजन्स ब्युरोचे मोठे अधिकाऱ्यांचाही सामावेश आहे. दरम्यान पंजाब सरकारने हल्ल्याप्रकरणातील माहीती देणाऱ्यासाठी ५० लाखांपर्यंत बक्षीस जाहीर केले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@