पंजाबमध्ये निरंकारी भवनावर ग्रेनेड हल्ला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Nov-2018
Total Views |

 


 
 
 
अमृतसर : अमृतसरच्या राजासांसी गावातील निरंकारी भवनावर ग्रेनेड हल्ला सकरण्यात आला आहे. दोन दुचाकी स्वारांनी हा हल्ला घडवून आणला. या हल्ल्यात ३ जण ठार झाले असून १० जण जखमी झाले आहेत. या बॉम्बस्फोटामुळे पंजाब हादरले आहे. पंजाबसह दिल्लीतही हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
 

आज सकाळी दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी या निरंकारी भवनावर ग्रेनेड हल्ला केला. या दोन्ही दुचाकीस्वारांनी आपला चेहरा झाकला होता. अचानक झालेल्या या हल्यामुळे अमृतसर परिसरात एकच खळबळ उडाली. हा हल्ला कोणी घडवून आणला हे जरी कळले नसले तरी त्यामागे कट्टरपंथीयांचा हात असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या हल्ल्यामुळे अमृतसरसहित संपूर्ण पंजाब राज्यात नाकाबंदी करण्यात आली आहे. दिल्ली, नोएडा, गुरुदासपूर, पठाणकोट आणि इतर काही शहरांमध्येही हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

 

आज झालेल्या धार्मिक स्थळावरील हल्ल्याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. काश्मीरमधील दहशतवादी झाकीर मुसा हा त्याच्या साथीदारांसह पंजाबमार्गे भारतात येणार आहे. अशी माहिती गुप्तचर विभागाने दिल्ली पोलीसांना दिली होती. जैश-ए-मोहम्मदचे ६-७ दहशतवादी फिरोजपूरला आले होते. हे दहशतवादी हल्ल्याचा कट रचत होते. त्याबाबतीत इशाराही देण्यात आला होता. निरंकारी भवनावरील हा ग्रेनेड हल्ला कोणी केला? याबाबत अनेक शक्यता वर्तविल्या जात आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@