भारतीय वंशाच्या नागरिकाची अमेरिकेत हत्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Nov-2018
Total Views |



वॉशिंग्टन : भारतीय वंशाचे सुनील एडला यांची न्यू जर्सीमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. एका १६ वर्षीय मुलाने त्यांची हत्या केली. दरम्यान, आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सुनील हे मूळचे तेलंगणातील मेदक येथील रहिवासी होते. सुनील गेल्या तीस वर्षांपासून अटलांटिक काउंटीमध्ये वास्तव्यास होते.

 

गुरूवारी रात्रपाळीसाठी कामावर जात असताना एका १६ वर्षीय मुलाने गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. त्यांच्या हत्येमागचे कारण अद्याप समजू शकले नाही. संबंधित मुलाने सुनील यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्यांची कार घेऊन पसार झाला. यानंतर त्याला रविवारी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती माहिती पोलिसांनी दिली. सुनील गुरुवारी रात्रपाळीसाठी निघाले होते. त्यावेळी घराजवळच मारेकऱ्याने त्यांची गोळ्या घालून हत्या केली असल्याची माहिती सुनील यांच्या कुटुंबीयांनी दिली.

 

सुनील एडला हे याच महिन्यात त्यांच्या आईचा ९५वा वाढदिवस साजरा करण्यासाठी आणि कुटुंबासोबत ख्रिसमस साजरा करण्यासाठी भारतात येणार होते. आरोपीचे वय लक्षात घेता पोलिसांनी त्याचे नाव समोर येऊ दिले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्या आरोपीवर हत्या, चोरी आणि कार चालकांना लुटणे असे गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. त्याच्याकडे बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्याप्रकरणीही चौकशी करण्यात येत आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@