मध्यप्रदेशात भाजपचे ‘दृष्टीपत्र’ जाहीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Nov-2018
Total Views |



 
 
मध्यप्रदेश : मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजप सरकारने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. भाजपने या जाहीरनाम्याला ‘दृष्टीपत्र’ असे नाव दिले आहे.
 

दरवर्षी दहा लाख घरे आणि नोकऱ्या देण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले आहे. तसेच विद्यार्थ्यांना मोफत स्कूटी देणार असल्याचेही आश्वासन दिले गेले आहे. "कृषि समृद्धी योजनेचा लाभ छोट्या शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे." असे यावेळी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले. मध्य प्रदेशातील जनतेशी संवाद साधून हे ‘दृष्टीपत्र’ तयार करण्यात आले आहे.

 
 
 

"गेल्या १५ वर्षांत मध्यप्रदेशमध्ये खूप विकास झाला आहे. मोफत शिक्षण, स्वस्त धान्य आणि स्वस्त वीजपुरवठा देण्याचा भाजप सरकारने पूर्ण प्रयत्न केला आहे. अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजा पूर्ण करण्याचा भाजप सरकारचा संकल्प आहे." असे यावेळी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले. 

 

  • असा आहे ‘दृष्टीपत्र’ हा जाहीरनामा

  • चंबल एक्सप्रेस मार्ग

  • नर्मदा एक्सप्रेस मार्ग

  • जबलपूर, ग्वालियर मेट्रो

  • १० लाख रोजगार निर्मिती

  • कर्मचाऱ्यांसाठी नवीन वेतन आयोग

  • आयटी क्षेत्रात पाच वर्षात पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक

  • शेतकऱ्यांच्या बँकखात्यात थेट पैसे जमा केले जाणार



    माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ 

 

@@AUTHORINFO_V1@@