भररस्त्यात विवाहितेचा विनयभंग,

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Nov-2018
Total Views |

आरोपीला अपिलातही शिक्षा व दंड


नंदुरबार, 16 नोव्हेंबर
भर रस्त्यात लज्जास्पद बोलत विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी अक्रमखा नासीरखा पठाण याला अपिलात 1 महिना सक्तमजुरी आणि 2 हजार रु. दंड अशी शिक्षा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने ठोठावली आहे.
 
मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांनी त्याला 6 महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली होती, त्यावर त्याने पुनरावेदन दाखल केले होते. 7 फेब्रुवारी 2014 रोजी दुपारी सव्वाचारच्या सुमारास शहरातील मच्छीबाजार चौकानजिक फिर्यादी विवाहिता मुलीला शिकवणीला सोडण्यास जात असताना आरोपीने तिला अडवून तिला लज्जा वाटेल असे बोलत दमदाटीही केली होती...तिने ही बाब पतीला सांगत फिर्यादही दिली, त्यानुसार गुन्हा दाखल झाला होता.
 
तपासाअंती उपनिरीक्षक शिवप्रकाश मुळे यांनी दोषारोप पत्र दाखल केले होते. सरकारतर्फे मुख्य न्यायंदडाधिकारी यांच्या न्यायासनासमोर अ‍ॅड.बी.यु.पाटील व अपिलात अ‍ॅड.तुषार कापडीया यांनी काम
पाहिले.
@@AUTHORINFO_V1@@