भारत-मालदीव नव्या पर्वाची सुरुवात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Nov-2018
Total Views |



माले : मालदीवमध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळवलेल्या इब्राहिम मोहमद सोली यांनी शनिवारी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. या सोहळ्यादरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील उपस्थित होते. त्यामुळे भारत मालदीव या दोन्ही देशांमधील नव्या पर्वाची ही सुरुवात असल्याचे मानले जात आहे. या सोहळ्यानंतर मोदींनी ट्वीटरवरून इब्राहिम मोहमद सोली यांना शुभेच्छादेखील दिल्या. तसेच ‘दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी एकत्रित काम करणार,’ अशी भावनादेखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.

 

मालदीवमध्ये सप्टेंबर महिन्यात राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत सोली यांना एकूण मतांपैकी ५८.४ टक्के मते मिळवत यामीन अब्दुल गयूम यांचा पराभव केला होता. दरम्यान, गयूम हे चीनच्या जवळील नेते म्हणून परिचयाचे होते. २०१३ सालीही निवडून आल्यानंतर यामीन यांनी त्यांच्याविरुद्धचे राजकीय मतभेद दडपून टाकण्यासाठी त्यांच्या विरोधकांना आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना तुरुंगात डांबले होते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत यामीन अब्दुल गयूम यांचा सोली यांनी पराभव केला. इब्राहिम मोहमद सोली हे भारताचे निकटवर्तीय मानले जातात.

 

शनिवारी सोली यांचा शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्याला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित होते. शपथविधीनंतर मोदींनी ट्वीटरद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासाठी नवनियुक्त राष्ट्राध्यक्षांसोबत काम करण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@