कल्याण विहीर अपघात प्रकरणी कडोंमपाला नोटीस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Nov-2018
Total Views |



डोंबिवली : कल्याण पूर्वेतील नेतीवली परिसरात विहीरीत बुडून पाच जणांना आपला जीव गमवावा लागला. याप्रकरणी महापालिकेने येथील रासायनिक कंपन्यांना नोटीसा बजावल्या होत्या मात्र आता प्रदूषण नियंत्रण मंडळानेच कडोंमपाला परिसरातील सांडपाणी प्रक्रिया न करताच सोडल्याबद्दल नोटीस बजावली आहे. ही दुर्घटना विहिरीतील घातक वायू निर्माण झाल्यामुळे झाली, होती त्यामुळे याला पालिकाच जबाबदार आहे, असा ठपकाही कडोंमपावर ठेवण्यात आला. तसेच, शहरातील सांडपाण्याचे योग्य नियोजन न केल्यास कारवाईचा इशारा प्रदूषण नियंत्रण मंडळाने पालिकेला पाठवलेल्या नोटीसमध्ये नमूद केले आहे.

 

दिवाळीच्या पहिल्या दिवशी चक्कीनाका येथील विहीर दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला. या परिसरातील सांडपाणी हे प्रक्रिया न करताच सोडले गेल्याने विहिरीत विषारी वायू निर्माण झाल्याचा ठपकाही प्रदूषण मंडळाने पालिकेला पाठवलेल्या नोटीसमध्ये ठेवला आहे. पालिकेने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या अल्प आणि दीर्घकालीन उपाययोजनेबाबत काय कार्यवाही केली याचा अहवाल नोटीस मिळाल्यापासून १५ दिवसात सादर करावा, अन्यथा प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे योग्य ती कारवाई करेल असा इशाराही प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला आहे.

 

उल्हासनदी प्रदूषणासंदर्भात वनशक्ती ट्रस्टने प्रदूषण मंडळाविरोधात सर्वोच्च न्यायालयाने याचिका दाखल केली होती. त्यावेळी कल्याण डोंबिवली महापालिकेने राष्ट्रीय हरित लवादामध्ये प्रदूषणाबाबत करावाईच्या उपाययोजनांचे शपथपत्र सादर केले होते. यात सर्वोच्च न्यायालयाने तसेच राष्ट्रीय हरित लवादाने सुनावणीप्रसंगी वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार पालिकेने कार्यवाही करण्याचे मान्य केले होते. यादरम्यान केंद्र शासनाच्या वतीने अमृत योजने अंतर्गत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुध्दा राबविण्यात आला. तरीही पालिकेने योग्य त्या उपाय योजना न केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कडोंमपाने योग्यवेळी प्रदुषणाविरोधात पाऊले उचलली नाही, तरी येत्या काळात पालिका अडचणीत येण्याची चिन्हे दिसत आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@