अँटी सबमरीन ‘रोमियो’ हेलिकॉप्टर खरेदी करणार भारत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Nov-2018
Total Views |

 

 
 
 
वॉशिंग्टन : अमेरिकेकडून तब्बल २४ अँटी सबमरीन ‘रोमियो’ हेलिकॉप्टर खरेदी करण्याची इच्छा भारताच्या संरक्षण मंत्रालयाकडून व्यक्त करण्यात आली आहे. या हेलिकॉप्टर्सची किंमत २ बिलीयन डॉलर्स असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या १० वर्षांपासून भारताला अशा सबमरीन हेलिकॉप्टर्सची गरज भासत आहे. भारतीय संरक्षण मंत्रालयाने यासंदर्भात अमेरिकेला पत्र लिहिले आहे. अशी माहिती संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे.
 

येत्या काही महिन्यांतच अमेरिकेशी हा करार करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सिंगापूर येथे झालेल्या रिजनल समिटमध्ये अमेरिकेचे उपराष्ट्रपती माईक पेंस यांच्याशी पंतप्रधान मोदी यांची भेट झाली होती. काही महिन्यापूर्वीच भारत आणि अमेरिका यांमध्ये संरक्षण करारावर चर्चा करण्यात आली होती. पंतप्रधान मोदी आणि माईक पेंस यांच्या भेटीदरम्यानही संरक्षण कराराविषयी चर्चा झाली होती. त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि माइक पेंस यांच्यात झालेली भेट ही महत्वाची मानली जात आहे.

 

या २४ अँटी सबमरीन ‘रोमियो’ हेलिकॉप्टरसारखेच आणखी १२३ हेलिकॉप्टर्स भारतात बनवण्याचा विचार केला जात आहे. असे सूत्रांकडून कळते. अशा प्रकारचे सबमरीन हेलिकॉप्टर्स हे फक्त जगात अमेरिकेकडेच आहेत. जगातील सर्वात अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले हे ‘रोमियो’ हेलिकॉप्टर्स आहेत. पाणबुडी नष्ट करण्यात हे ‘रोमियो’ हेलिकॉप्टर्स खूपच कुशल आहेत.

 
 
          माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/  
@@AUTHORINFO_V1@@