तळोद्यातील शिबिरात 55 बाटल्या रक्त संकलित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Nov-2018
Total Views |

 
तळोदा, 16 नोव्हेंबर
 
श्रीराम जन्मभूमीसाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, अशा कोठारी बंधू आणि जन्मभूमीचे आंदोलक व विश्व हिंदू परिषदेचे नेते प.पू. स्व. श्री अशोकजी सिंघल यांच्या तृतीय पुण्यस्मरणार्थ तसेच विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या संयुक्त विद्यमाने तळोदा शहरातील बालाजीवाड्यामध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात 55 दात्यांनी रक्तदान केले.
 
‘रक्तदान हेच जीवनदान, हेच सर्वश्रेष्ठ दान’ असे समजले जाते. राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढीमधील साठा कमी पडू लागला आहे. हीच गरज लक्षात घेऊन तळोदा येथील विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे सलग तीन वर्षांपासून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असते.
 
यावेळी रक्तदान केलेल्या दात्यांना विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे घड्याळ व प्रशस्तीपत्र देण्यात आले. धुळे येथील नवजीवन ब्लड बँक या ठिकाणी रक्त साठवण (ब्लड स्टोरेज सेंटर) केंद्र आहे, त्याठिकाणी हे रक्त ठेवण्यात येणार आहे.
 
 
या शिबिराला तळोदा येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष अजय परदेशी, पोलीस उपनिरीक्षक सुदेश सोनवणे, नगरसेवक सुभाष चौधरी, नगरसेवक हेमलाल मगरे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
 
यावेळी विश्व हिंदू परिषदेचे प्र.अध्यक्ष रमाकांत मगरे, विश्व हिंदू परिषदचे जिल्हा मंत्री विजय सोनवणे, विश्व हिंदू परिषदेचे प्रखंड मंत्री दीपक मोतीलाल चौधरी, बजरंग दल संयोजक योगेश चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते संतोष माळी, विश्व हिंदू परिषदचे जिल्हा उपाध्यक्ष केवलसिंग राजपूत, इंद्रसिंग गिरासे, मंगलसिंग परदेशी, योगेश चव्हाण, भाजपा तालुका अश्याक्ष राजेंद्र राजपूत, ज्येष्ठ व्यापारी संजय वाणी, यांसह विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या शिबिरासाठी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली.
@@AUTHORINFO_V1@@