नोटाबंदीविना अर्थव्यवस्था कोलमडली असती : एस. गुरुमूर्ती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Nov-2018
Total Views |
 
 

नवी दिल्ली : रा. स्व. संघाचे विचारक आणि भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या व्यवस्थापकीय मंडळाचे सदस्य एस. गुरुमूर्ती यांनी गुरुवारी नोटाबंदीचे समर्थन करत भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक असल्याचे म्हटले आहे. नोटाबंदी झाली नसती तर भारताची अर्थव्यवस्था कोलमडली असती, अशी प्रतिक्रीया त्यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. पाचशे आणि हजाराच्या नोटांचा वापर केवळ सोने खरेदी आणि बांधकाम व्यवसायाय क्षेत्रात केला जायचा, असे ते म्हणाले.

 

विकास इंटरनॅशनल फाऊंडेशनमध्ये व्याख्यानमाले दरम्यान त्यांनी नोटाबंदीवर भाष्य केले. नोटाबंदीच्या १८ महिन्यांपूर्वी पाचशे आणि हजाराच्या नोटांचे मुल्य ४.८ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले. हा पैसा नोटाबंदी पूर्वी सोनखरेदी आणि बांधकाम क्षेत्रात प्रामुख्याने वापरला जात होता. नोटाबंदी झाली नसती तर २००८ मधल्या मंदीची पूर्नरावृत्ती झाली असती. नोटाबंदी नसती तर भारतीय अर्थव्यवस्था कोलमडली असती. त्यामुळे याकडे एका सुधारणात्मक उपाय म्हणून पाहायला हवे., असेही ते म्हणाले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@