आठवड्याला निर्देशांकांचा तेजीने निरोप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Nov-2018
Total Views |



मुंबई : बॅंकींग, फार्मा, आयटी आदी क्षेत्रात झालेल्या चौफेर खरेदीने आठवडाअखेरीस बाजार तेजीने बंद झाले. रिलायन्सचे वाढते बाजारमुल्य, एअरटेल व्होडाफोन आणि ब्ल्युचिप शेअरमध्ये झालेल्या खरेदीमुळे दोन्ही निर्देशांक वधारले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १९७ अंशांनी वधारुन ३५ हजार ४५७च्या स्तरावर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशाक निफ्टी ६६ अंशांनी वधारून १० हजार ६८२ अंशांनी वधारला.

 

शुक्रवारी शेअर बाजार उघडताच दोन्ही निर्देशांकांनी उसळी घेतली. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स ३५ हजार ५४६ अंशांचा राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीने १० हजार ६४४ अंशांचा उच्चांकी टप्पा ओलांडला होता. रिलायन्सचा शेअर अडिच टक्क्यांनी वधारल्याने सर्वात जास्त बाजारमुल्य असलेली कंपनी ठरली. रिलायन्स जिओने टॅरीफ वाढीच्या घोषणेने भारती एअरटेल आणि व्होडाफोनचे शेअर वधारले. टाटा समुहासोबत जेट एअरवेजच्या खरेदीबद्दल बैठकीच्या पार्श्वभूमीवर जेट एअरवेजचा शेअर आठ टक्क्यांनी वधारला.

 

बॅंकींग, फार्मा आणि आयटी कंपन्यांमध्ये खरेदी दिसून आल्याने बाजार सावरण्यास मदत जाली. बॅंकींग क्षेत्रातील बॅंक ऑफ इंडिया, ओरिएंटल बॅंक ऑफ कॉमर्स, कॅनरा बॅंक, पीएनबी आदी शेअर ते टक्क्यांनी वधारले. आयटी इंडेक्स .३६ टक्क्यांनी वधारला. एचसीएल टेकमध्ये सर्वाधिक खरेदी दिसून आली. कंपनीचा शेअर .३६ टक्क्यांनी वधारला. फार्मा कंपन्यांमध्ये सिप्ला, दिवीज लॅब, पीरामल एंटरप्रायझेस, ल्युपिन आदी शेअर टक्क्यांपर्यंत वाढले.

 

येस बॅंकेच्या शेअरमध्ये टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली. बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर यांचा उत्तराधिकारी निवडण्याच्या प्रक्रियेदरम्यान निवड केलेल्या समिती सदस्यांपैकी एक असलेले .पी. भट्ट यांच्या राजीनाम्याची टांगती तलवार कायम आहे. याचा परिणाम बॅंकेच्या शेअरवर दिसून आला. .१४ टक्क्यांनी घसरुन १९१.३० रुपयांवर स्थिरावला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@