बाजारमुल्यात रिलायन्स अव्वल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Nov-2018
Total Views |

 

 
मुंबई : देशातील मोठी आयटी कंपनी टीसीएसला मागे टाकून रिलायन्सने पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केले आहे. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीचा शेअर शुक्रवारी अडीच टक्क्यांनी वधारला. त्यामुळे दोन्ही निर्देशांकत कंपनीचे बाजारमुल्य .१४ लाख कोटी इतके झाले.
 
टीसीएसचे बाजारमुल्य .०३ लाखांवर असून बाजारात दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. शुक्रवारी कंपनीचा शेअरही .५० टक्क्यांनी मजबूत झालामुकेश अंबानींच्या रिलायन्स कंपनीच्या शेअरने शुक्रवारी बाजार उघडताच उसळी घेत शेअर १०९६ रुपयांवर पोहोचला.
 

दुपारपर्यंत २८.१५ वाढीसह तो ११२५ रुपयांवर बंद झाला. टीसीएसचा शेअर शुक्रवारी १८८९.९० रुपयांवर खुला झाला. दिवसभरात तो १८९८.५५ रुपयांवर पोहोचला. दिवसअखेर शेअर १६.१५ अंशांनी वधारुन १८८९ वर बंद झाला. दरम्यान ऑगस्टअखेर टीसीएस ही सर्वात जास्त बाजारमुल्य असलेली कंपनी ठरली होती.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@