कॉंग्रेसने चार पीढ्यांचा हिशोब द्यावा : नरेंद्र मोदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Nov-2018
Total Views |


रायपूर : छत्तीसगडमध्ये २० नोव्हेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यातील ७२ जागांसाठी मतदान सुरू आहे. मतदारांशी संवाद साधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंबिकापूर येथे उपस्थित मतदारांना संबोधित केले. यावेळी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला. कॉंग्रेसच्या चार पीढ्यांनी हिशोब द्यावा मी माझ्या चार वर्षांचा हिशोब द्यायला तयार आहे, असा घणाघात त्यांनी यावेळी लगावला.

 

अंबिकापूरमध्ये प्रचारादरम्यान लाल किल्ल्याची प्रतिकृती तयार केली होती. कार्यकत्यांचे आभार मानत त्यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले, गांधी कुटूंबियांना एक चहावाला पंतप्रधान होऊ शकतो याचेही आश्चर्य वाटत आहे. लाल किल्ल्यावरून गांधी कुटूंबाशिवाय अन्य कुणीही भाषण देते हे त्यांना पचवता येत नाही. चहावाला पंतप्रधान झाल्याने त्यांची झोप उडाली. आहे.’’

 

गांधी परिवारातील प्रत्येकजण हा पक्षाचा अध्यक्ष बनला आहे. नेहरुजींच्या विचारसरणीनुसार लोकशाहीने नियुक्ती व्हायला हवी होती. मात्र, आजवर ते मोठेपण गांधी कुटूंबियांनी दाखवली. देशातील जनतेने सत्तेच्या गादीवरुनही खाली खेचले. त्यामुळे नोटाबंदी, जीएसटीसारख्या निर्णयाच्या अंमलबजावणीनंतर कॉंग्रेसचे रडगाणे सुरू आहे. छत्तीसग़डमध्ये नोटाबंदीविषयी कुणाची तक्रार नाही येथील जनता वाजपेयी पंतप्रधान बनल्यापासून त्यांचा साथ देत आहे., असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

 

विक्रमी मतदान करा !

अंबिकापूरमधल्या जनतेला त्यांनी रेकॉर्ड ब्रेक मतदान करण्यासाठी आवाहन केले आहे. आम्ही विकास करू तेव्हा गरीब श्रीमंत असा भेदभाव करणार नाही. आम्हाला सर्वांगीण विकास करायचा आहे. आरोग्याच्या सोयी समाजाती शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत. शिक्षणाच्या सोयी लोकांना द्यायच्या आहेत. सबका साथ सबका विकास हाच आमचा मंत्र आहे आणि या तत्वावरच भाजपने चार वर्षे सरकार चालवले असल्याचे ते म्हणाले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@