टी-२०त मितालीने रोहित, विराटला धोबीपछाड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Nov-2018
Total Views |


 


नवी दिल्ली: भारतीय टी-२०च्या क्रिकेटविश्वात धडाकेबाज फलंदाज म्हणून ओळखले जातात ते म्हणजे भारतीय कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा. पण या सर्वांना मागे टाकत भारतीय महिला क्रिकेटर मिताली राज हिने टी-२०तील पुरुष आणि महिला दोन्हींमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. महिला क्रिकेटमधील 'मास्टर ब्लास्टर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मितालीने आत्तापर्यंत ८० डावांमध्ये २२८३ धावा केल्या आहेत.

 

मिताली राजने ८० डावांमध्ये १७ अर्धशतकांच्या सहाय्याने आणि ३७.४२ च्या सरासरीने २२८३ धावांचा डोंगर सर केला आहे. तर सध्या रोहित शर्माच्या खात्यात ८० डावांमध्ये २२०७ धावा जमा आहेत. भारतीय कर्णधार विराट कोहली हा ५८ डावांमध्ये ४८.८८च्या सरासरीने २१०२ धावा केल्या आहेत. रोहित इतकेच डाव खेळूनही मितालीने त्याच्यापेक्षा अधिक धाव केल्या आहेत. मिताली राजने महिला वर्ल्ड टी-२०मध्ये पाकिस्तानविरुद्ध ५६ धावांची खेळी करून रोहितलाही मागे टाकले.

 
 
 

महिला टी-२० क्रिकेटमध्ये मिताली राज ही चौथ्या स्थानावर आहे. सर्वाधिक २९९६ धाव करून न्यूझीलंडची सूजी बेट्स पहिल्या स्थानी विराजमान आहे. तर वेस्ट इंडिजची स्टेफनी टेलर ही २६९१ धावा करून दुसऱ्या स्थानी आणि २६०५ धावा करून इंग्लंडची एडवर्ड तिसऱ्या स्थानी आहे. आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये (महिला आणि पुरुष) सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरचा चौथा क्रमांक लागतो. तिने आत्तापर्यंत ८० डावांमध्ये १८२७ धावा केल्या आहेत. पाचव्या स्थानी सुरेश रैना, तर सहाव्या स्थानी महेंद्रसिंग धोनी आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@