१ जानेवारीपासून पुण्यात 'हेल्मेट'सक्ती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Nov-2018
Total Views |


 


पुणे: पुण्यात नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच १ जानेवारीपासून हेल्मेटसक्ती करण्यात येणार आहे. पोलीस आयुक्तांनी हेल्मेटसक्तीचा निर्णय घेतला आहे. वाढत्या अपघातांमुळे न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली. यापूर्वीही पुण्यामध्ये हेल्मेटसक्ती करण्यात आली होती. मात्र नागरिकांच्या विरोधामुळे त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही.

 

आयुक्तांनी हेल्मेटसक्तीचा निर्णय देताच पुण्यात पुन्हा एकदा नागरिक रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे. याआधीही पुण्यात हेल्मेटसक्ती कऱण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र प्रशासनाला नागरिकांच्या संतापाला सामोरे जावे लागले होते. ठिकठिकाणी सर्वसामान्य नागरिकांनी रस्त्यांवर उतरुन निर्णयाचा निषेध केला होता.हेल्मेटमुळे मानदुखी जडते, आजूबाजूचे दिसण्यात अचडण येते असा आक्षेप घेत त्यांनी हेल्मेटसक्तीला विरोध केला होता.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@