नवी मुंबई महापालिकेत ४४८ पदांसाठी भरती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Nov-2018
Total Views |
 
 

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या आकृतीबंधास राज्य सरकारची मंजुरी प्राप्त झाली आहे. आरोग्य व अग्निशमन विभागामध्ये ४४८ पदांची भरती महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी कॉर्पोरेशन लि. यांचेमार्फत १६, १७ व १८ नोव्हेंबर २०१८ रोजी ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे.

 

महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एकूण ५५ केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. परीक्षा प्रक्रिया पूर्णत: पारदर्शक पद्धतीने पार पडावी याकडे महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी आरंभापासून विशेष लक्ष दिले असून ऑनलाईन प्रक्रियेमुळे ही परीक्षा मानवी हस्तक्षेपाविना सुनियोजित पद्धतीने पार पडणार आहे. संपूर्ण राज्यात विविध जिल्ह्यांत ५५ केंद्रांवर आरोग्य विभागाच्या स्टाफ नर्स / नर्स मिडवाईफ (१३० पदे), प्रयोगशाळा तंत्रज्ञान (४ पदे), ई.सी.जी. तंत्रज्ञ (७ पदे), रक्तपेढी तंत्रज्ञ (३ पदे), ऑक्झिलरी नर्स / मिडवाईफ (३२ पदे), शस्त्रक्रियागृह (१२ पदे), अशा ६ संवर्गातील एकूण १८८ पदांकरिता तसेच अग्निशमन विभागाच्या विभागीय अग्निशमन अधिकारी (एक पद), अग्निशमन केंद्र अधिकारी (२ पदे), अग्निशमन प्रणेता (१० पदे), अग्निशामक (२०८ पदे), वाहनचालकअग्निशमन (३९ पदे) अशा पाच संवर्गातील एकूण २६० पदांसाठी म्हणजेच एकूण ४४८ पदांकरिता ही ऑनलाईन परीक्षा होणार आहे.

 

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्रत्येक केंद्रावर एका निरीक्षकाची नेमणूक करण्यात आलेली आहे. आरोग्य व अग्निशमन या विभागांचे कामकाज अधिक गतिमान व्हावे या दृष्टीने ही पदभरती अतिशय महत्त्वाची असून ही परीक्षा प्रक्रिया सुरळीत व स्वच्छ पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याकडे महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली कटाक्षाने लक्ष दिले जात आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@