देशहितासाठी पुन्हा एकदा 'मोदी सरकार' - नारायण मूर्ती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Nov-2018
Total Views |


 


नवी दिल्ली : इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गेल्या पाच वर्षातील कामाचे कौतुक केले. तसेच पुढील पंचवार्षिक निवडणुकात मोदी निवडून येणं देशहिताचे असल्याचे देखील त्यांनी नमूद केलं. एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या मुलाखती दरम्यान त्यांनी आपलं मत मांडले. ते यावेळी म्हणाले, "भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सध्याचे सरकार पुन्हा सत्तेत येणे फायद्याचे ठरणार आहे. तसेच देशातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी पंतप्रधान प्रयत्न करत आहेत. ही देशासाठी सकारात्मक बाब आहे."

 

नारायण मूर्ती यांनी जीएसटी व आरबीआय वरून मोदी सरकारची पाठराखण करत आरबीआय व सरकारमधील वाद लवकर संपेल अशी अशा व्यक्त केली. तसेच त्यांनी राफेल करारावर भाष्य करणं टाळलं. ते म्हणाले, "जो पर्यंत सत्य बाहेर येत नाही तो पर्यंत यावर बोलणे चुकीचे आहे." देशाची आर्थिक स्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करणारा नेता आपल्याला भेटला आहे. अशा नेत्याचा आपण आदर केला पाहिजे. मागील पाच वर्षाचे काम पाहिल्यास मोदी सरकार पुन्हा सत्तेत येणेच देशाच्या हिताचे आहे.

 

नारायण मूर्ती यांनी १९८१ साली इन्फोसिस कंपनीची स्थापना केली होती. १९८१ ते २००२ पर्यंत ते या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची धुरा सांभाळली होती. तसेच २००२ ते २०११ पर्यंत ते कंपनीच्या चेअरमन पदावर विराजमान होते. २०११ साली त्यांनी आपल्या निवृत्तीची घोषणा केली होती.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/


@@AUTHORINFO_V1@@