रविवारी मध्य रेल्वेवर ६ तासांचा जम्बो ब्लॉक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Nov-2018
Total Views |

 


 
 
 

लांब पल्ल्याच्या १५० लोकल फेऱ्या रद्द

 

कल्याण : शहरातील १०० वर्षे जुना पत्री पुलाच्या पाडकामासाठी रविवारी मध्ये रेल्वेवर सहा तासांचा जम्बो मेगाब्लॉक घेण्याचे नियोजन मध्ये रेल्वेकडून केले जात आहे. या जम्बो ब्लॉकमुळे रेल्वेच्या संपूर्ण वेळापत्रकावर परिणाम होणार आहे, लांब पल्ल्याच्या जवळ जवळ १५० लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत. त्यामुळे येत्या रविवारी कल्याण स्थानकावरुन सकाळी ९.३० ते दुपारी ३.३० पर्यंत मुंबईला जाणारी व येणारी दोन्ही मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे.

 

अंधेरी स्थानकातील उड्डाणपुलावरील पादचारी मार्गिका कोसळल्याच्यानंतर पश्चिम व मध्य रेल्वेने सर्व स्थानकांतील उड्डाणपूल व पादचारी पुलांची तपासणी हाती घेतली होती. यात कल्याण येथील पत्रीपूलही धोकादायक असल्याचे निदर्शनास आल्यानंतर रेल्वेच्या वतीने जुलै २०१८ पासून हा पत्री पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. अखेर हा पूल तोडण्याचे काम रेल्वेच्या वतीने सुरु करण्यात आले असून त्याकरिता रेल्वेच्या वतीने येत्या रविवारी जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे लांब पल्ल्याच्या मुंबई ते नाशिक, पुणे दरम्यानच्या मेल-एक्स्प्रेस रद्द करण्यात येणार आहेत.

 
येत्या काही दिवसांत हा पत्री पुल पाडण्याच्या दृष्टीने रेल्वेच्या वतीने वेळापत्रक आखले जात आहे. यामुळे रेल्वेच्या वतीने या ब्लॉकदरम्यान हजारो प्रवाशांनी पर्यायी रस्ते वाहतुकीचा पर्याय निवडावा, म्हणजे गैरसोय होणार नाही. असे आवाहन केले आहे. दरम्यान लोकांची गैरसोय होऊ नये याकरिता रविवारी डोंबिवली स्थानकातून विशेष लोकल सेवाही चालवण्यात येणार आहे.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@