समीर धर्माधिकारी दिसणार 'डॉन'च्या भूमिकेत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Nov-2018
Total Views |


 


मुंबई : जी कुमार पाटील एंटरटेण्मेंटप्रस्तुत तू तिथे असावेहा आगामी मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आपल्या विविधांगी भूमिकांनी मराठी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी छाप सोडणाऱ्या समीर धर्माधिकारीचा वेगळा अंदाज प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. गणेश पाटील यांनी निर्मित केलेल्या या चित्रपटाचे संतोष गायकवाड यांनी दिग्दर्शन केले आहे.

 

या चित्रपटात समीरने बाबा भाईया डॉनची भूमिका साकारली असून यात तो 'रावडी लूक'मध्ये दिसणार आहे. या भूमिकेबद्दल बोलताना समीरने सांगितलं की, "यात मी साकारलेला डॉन हा चांगल्याशी चांगला तर वाईटाशी वाईटअसा आहे. ग्रे शेड असलेली भूमिका साकारताना मेकअप, बॉडी लँग्वेज, फेशियल एक्स्प्रेशन्स या सगळ्यांकडे खास लक्ष द्यावं लागतं. भूमिका कोणत्याही प्रकारची असली, तरी ती चांगली व्हावी यासाठी कलाकारांना कष्ट घ्यावे लागतात. एकाच इमेजमध्ये अडकून पडायचं नसल्याने ही वेगळी भूमिका स्वीकारल्याचं ते सांगतात."

 

या चित्रपटात समीर यांच्यासोबत भूषण प्रधान, पल्लवी पाटील, मोहन जोशी, अरुण नलावडे, विजय पाटकर, जयवंत वाडकर, मास्टर तेजस पाटील, श्रीकांत वट्टमवार, अभिलाषा पाटील, विशाखा घुबे हे कलाकार आहेत. चित्रपटाची कथा आणि पटकथा आशिष विरकर यांनी लिहिली आहे. तर संवाद आशिष विरकर आणि दिपक अंगेवार यांचे आहेत. दरम्यान, येत्या ७ डिसेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@