राष्ट्रीय उद्योजकता पुरस्काराची घोषणा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Nov-2018
Total Views |
 

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सुक्ष्म व लघू उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि कर सवलत, अनुदान आणि कमी व्याजदरात कर्ज आदींसह मेहनती उद्योजकांचा आता सन्मान करण्याचेही ठरवले आहे. कौशल्य विकास मंत्रालयाने 'राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार २०१८' जाहीर केला आहे. तरूण, होतकरू आणि उद्योगाची पार्श्वभूमी नसताना व्यवसाय उभा करणाऱ्यांचा सत्कार करण्यासाठी हे पुरस्कार दिले जाणार आहेत. नोकरीच्या चाकोरीतून व्यावसायाकडे वळणाऱ्या, जोखीम स्वीकारणाऱ्या तरुणांचा याद्वारे सन्मान केला जाणार आहे. 

 

या पुरस्कारासाठी नामांकन नोंदवण्यासाठी www.neas.gov.in या संकेस्थळावर १६ नोव्हेंबरपर्यंत नोंदणी केली जाऊ शकते. सरकारतर्फे एकूण ४३ पुरस्कार दिले जाणार आहेत. यातील ३९ पुरस्कार तरूण उद्योजकांना तर चार उद्योजकतेच्या वातावरणाची निर्मिती करणाऱ्यांना व्यक्तींना देण्यात येतील. यासाठी नामांकन नोंदवणाऱ्या उद्योजकाचे वय चाळीस वर्षांपेक्षा कमी असावे. उद्योजकाला घरातून व्यापाराची पार्श्वभूमी नसावी, महिला उद्योजक असल्यास उद्योगातील ७५ टक्क्यांहून अधिक मालकी असावी. यातील विजेत्यांचा पुरस्कार सोहळ्यात मान्यवरांतर्फे सन्मान केला जाणार आहे. हा कार्यक्रम कौशल्य विकास मंत्रालय आयोजित करणार आहे. एकूण २.३ कोटींचे मानधन दिले जाणार आहे. वैयक्तिक उद्योजकासाठी बक्षीसाची रक्कम पाच लाख रुपये तर संस्थांसाठी दहा लाख रुपये आहे. 

 

दरम्यान, या पुरस्कारांचे तीन वर्गीकरण केले जाणार आहे. यात एक लाखहून कमी भांडवल असलेले उद्योजकांचा पहिला गट, एक लाख ते १० लाखादरम्यान भांडवल असलेले उद्योजक दुसरा गट, १० लाखहून अधिक भांडवल असणारे उद्योजकांचा तिसरा गट असणार आहे. राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार केंद्रीय कौशल्य विकास मंत्रालयाचा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@