एसबीआय जनधन खात्यांमध्ये २६०० कोटींच्या ठेवी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Nov-2018
Total Views |
 
 

नवी दिल्ली : स्टेट बॅंक इंडियाचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी पंतप्रधान जनधन योजनेसंदर्भात महत्वपूर्ण माहिती दिली आहे. गेल्या वर्षभरात ३० कोटी खातेधारक जनधन योजनेद्वारे बॅंकींग व्यवस्थेशी संलग्न झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. एकूण जनधन खात्यांपैकी सुमारे ३२ टक्के खातेधारक एसबीआयचे आहेत. बॅंकेतील ठेवींनुसार २६० अब्ज रुपये जनधन खात्याद्वारे जमा झाल्याची माहिती त्यांनी दिली. सिंगापूर येथे एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी ही माहिती दिली.

 

पंतप्रधान जनधन योजनेचे ते म्हणाले, या योजनेच्या अभूतपूर्व अशा यशामुळे आम्हाला वर्षभरात एकूण ३० कोटी नव्या ग्राहकांना बॅंकिंग व्यवस्थेशी जोडणे शक्य झाले. पंतप्रधान जनधन योजनेतून बॅंकेकडे २६०० कोटींच्या ठेवी जमा झाल्या आहेत. २०१४ मध्ये लोकसंख्येच्या ५० टक्क्यांपेक्षाही कमी लोकांचे बॅंकेत खाते होते. मात्र, जनधन योजनेमुळे देशातील त्यात लक्षणीय वाढ झाली आहे. ’’

 

केंद्र सरकारने जनधन योजना अनिश्चित कालावधीसाठी खुली ठेवली आहे. याशिवाय पंतप्रधान विमा योजनेचीही व्याप्ती वाढवत जोखमीच्या किमतीची रक्कम दुप्पट आणि विम्यासाठीच्या वयोमानाच्या मर्यादेत पाच वर्षांची सुट दिली होती. जनधन योजनेत शिल्लक रक्कमेपेक्षा पाच हजार रुपये काढता येणे शक्य होते. मात्र, ही मर्यादा आता १० हजारांवर केली आहे. आत्तापर्यंत ३२.४१ कोटी जनधन खाती उघडण्यात आली आहेत. त्यात एकूण ८१ हजार २०० कोटी रुपयांच्या ठेवी जमा आहेत. यातील ५३ टक्के महिला आणि ५९ टक्के ग्रामीण भागातील खातेधारक आहेत. जम्मू काश्मिर वगळता अन्य राज्यातील एकूण ८३ टक्के खाती ही थेट आधार कार्डशी जोडली गेली आहेत. त्यापैकी २४.४ कोटी ग्राहकांना रुपे कार्ड देण्यात आली आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@