...आणि ‘श्री रामायण एक्सप्रेस’ निघाली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Nov-2018
Total Views |


नवी दिल्ली : देशाची राजधानी नवी दिल्लीतील सफरदरजंग स्थानकातून बुधवारी रामायण एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ठिकाणांना भेट देण्यात येणार आहे. हा सोळा दिवसांचा प्रवास श्रीलंकेमध्ये संपेल. दरम्यान, पहिल्या यात्रेत आठशे यात्रेकरू सहभागी झाले आहेत.

 

 
 

या यात्रेची काही प्रमुख वैशिष्टे आहेत. भारतातील प्रवास तमिळनाडूतील रामेश्वरमपर्यंत १६ दिवस पूर्ण होतात. प्रभू श्रीरामांच्या आयुष्याशी निगडीत असलेल्या सर्व ठिकाणी यात्रेकरूना भेटी देता येणार आहेत. पुढे चेन्नईतून श्रीलंकेला जाण्यासाठी विमानाची सोय असणार आहे. एकावेळी आठशे जण यात सहभागी होऊ शकतात.

 

 
 
 

दिल्लीहून निघाल्यावर श्री रामायण एक्सप्रेसचा पहिला थांबा अयोद्धेला असणार आहे. त्यानंतर यात्रेकरूंना हनुमान गढी, रामकोट आणि कनक भवन मंदिरला जाता येणार आहे. यानंतर रेल्वे सर्व महत्वाच्या स्थानकांवर थांबा घेईल. यात नंदीग्राम, सीतामढी, जनकपूर, वाराणसी, प्रयाग, शृगवेपूर, चित्रकूट, नाशिक, हम्पी आणि रामेश्वरम आदी स्थानकांचा यात सामावेश आहे.

 
 
 

श्रीलंकेच्या यात्रेसाठी वेगवेगळे प्रवासी शुल्क आकारले जाईल. श्रीलंकेला जाणाऱ्या प्रवाशांसाठी चेन्नई ते कोलंबोसाठीचा हवाई मार्ग निवडू शकतात. सद्यस्थितीत आयआरसीटीसीने ४७ हजार ६०० रुपये प्रतिव्यक्ती शुक्ल आकारणी सुरू केली आहे. यात पाच रात्री आणि सहा दिवसांची सोय आहेरामायण एक्सप्रेसमध्ये जेवण, राहण्याची व्यवस्था, कपडे धुण्याच्या सोईसह प्रेक्षणीय स्थळांच्या ठिकाणी पोहोचण्यासाठीही सोय केली आहे. आयआरसीटीसीचे एक यात्रा व्यवस्थापक पूर्णवेळ यात्रेकरूंसोबत असणार आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@