काश्मीरप्रकरणी आफ्रिदीकडून पाकला घरचा आहेर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Nov-2018
Total Views |


 


काश्मीरची चिंता करू नका, पहिले देशातील नागरिकांची काळजी घ्या!


नवी दिल्ली : पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदीने काश्मीर प्रकरणी पुन्हा एकदा पाकिस्तानला घरचा आहेर दिला आहे. लंडनमधील एका कार्यक्रमात बोलताना पाकिस्तानने काश्मीरची चिंता करायची गरज नसल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानने काश्मीरची चिंता न करता पहिले देशातील लोकांची काळजी घ्यावी अशा आशयाचा आफ्रिदीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये जोरदार व्हायरल होत आहे.

लंडनमधील ब्रिटिश पार्लमेंटमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधताना आफ्रिदीने पाकिस्तानला हा टोला लगावला. तो यावेळी म्हणाला, "‘काश्मीर हा काही मुद्दा नाहीये, चला मी सांगतो पाकिस्तानला काश्मीर नकोय. भारतालाही काश्मीर देऊ नका. काश्मीर स्वतंत्र राष्ट्र बनला पाहिजे, जेणेकरून तेथील माणूस जिवंत राहिला पाहिजे. पाकिस्तानला सध्या त्यांची चार प्रांतच सांभाळली जात नाहीयेत तर काश्मीर काय सांभाळणार? काश्मीरमधील लोक मरत आहेत. माणूस मरल्यावर त्रास होतोच मग ते लोक कोणत्याही धर्माचे लोक असोत. माणुसकी मोठी गोष्ट आहे. त्यामुळे माणूस जिवंत राहिला पाहिजे." अशाप्रकारे आफ्रिदीने काश्मीरप्रकरणी पाकला घरचा आहेर दिला.

 

आफ्रिदीच्या या व्हायरल व्हिडिओनंतर अनेकांनी त्याचे स्वागत केले आहे तर अनेकांनी त्याच्यावर टीका केली आहे. मात्र पाकिस्तानकडून अधिकृत कोणतीही माहिती अजून समोर आली नाही. दरम्यान, यापूर्वीदेखील आफ्रिदीने काश्मीरप्रकरणी अनेकवेळेस विधान केले आहेत. त्यामुळे आता त्याच्या या वक्तव्यामुळे पाकिस्तानमध्ये नवीन वाद उभा राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@