राज्यस्तरीय मुख्याध्यापक संघ महामंडळ अधिवेशन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Nov-2018
Total Views |

पथराई येथे हरिश्चंद्र गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण


नंदुरबार, 13 नोव्हेंबर
तालुक्यातील पथराई येथे सुरू झालेल्या 58 व्या राज्यस्तरीय माध्य. व उच्च माध्य. शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या अधिवेशनास हरिश्चंद्र गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहणाने सुरुवात झाली. याप्रसंगी संघाचे पदाधिकारी व विविध जिल्ह्यातून आलेले मुख्याध्यापक उपस्थित होते.
 
स्वागताध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत यांनी अधिवेशनास आलेल्या महामंडळाचे अध्यक्ष विजयसिंह गायकवाड, सचिव आदिनाथ थोरात, अधिवेशनाचे अध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड यांच्यासह पदाधिकारी व मान्यवरांचे सत्कार व स्वागत केले.
 
तद्नंतर अधिवेशनस्थळी कौन्सिल सभा झाली. सभेसाठी संघाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. सभेत मागील इतिवत्त वाचन झाले. विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. महामंडळाचे अध्यक्ष विजयसिंह गायकवाड यांनी अधिवेशन स्थळाविषयी बोलताना सांगितले की, पहिल्यांदाच एकाच ठिकाणी अधिवेशन व राहण्याची सोय असल्यामुळे व शहरापासून अंतरावर निसर्गरम्य अशा ठिकाणी असल्यामुळे ते नक्कीच अविस्मरणीय ठरेल.
 
सचिव आदिनाथ थोरात यांनी उपस्थितांना पूर्णवेळ थांबण्याचे आवाहन केले. तसेच एकंदरीत वातावरणच अधिवेशनासाठी पोषक असल्याकारणाने ते यशस्वी होईल, याची ग्वाही दिली.
 
नियोजनाविषयी कौतुक करताना सांगितले की, येथील स्वागताध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत स्वतः लक्ष देऊन पाठपुरावा करीत असल्या कारणाने अवघ्या 15 दिवसात अधिवेशनस्थळाची उभारणी केली.
 
नंदुरबार मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मुकेश पाटील यांनी बैठकीत नियोजनाविषयी माहिती दिली. नोंदणीसाठी सहकार्य करण्याचेही आवाहन केले.
 
 
तद्नंतर दुपारी नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रजनीताई नाईक यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले.
नंदुरबार मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मुकेश पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानून पुढे सांगितले की, हे अधिवेशन नंदुरबारला घेणे शक्य नव्हते; परंतु सहकारी मित्र व संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत यांच्या पाठबळामुळेच ते शक्य झाले.
 
महामंडळाचे अध्यक्ष विजयसिंह गायकवाड यांनी आपल्या शिरीषकुमार मेहता यांच्या पावनभूमीत नतमस्तक होऊन मनोगतात म्हटले की, शैक्षणिक विचारमंथन, एकसूत्रीपणा येण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे.विधान परिषद सदस्य विक्रम काळे यांनी आपल्या विनोदी शैलीत व परखडपणे मनोगत व्यक्त केले.
 
स्वागताध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत यांनी आपल्या स्वागत भाषणात उपस्थितांचे स्वागत व आभार मानले. सुधीर तांबे यांनी इतर देशाची बरोबरी करण्यासाठी आपला भारतीय माणूसदेखील कुठेही कमी पडणार नाही. देशाला चांगल्या शिक्षणाची गरज असून त्याची चर्चा होणे आवश्यक असल्याचे सांगितले.
यांची होती उपस्थिती
 
यावेळी विधान परिषद सदस्य विक्रम काळे, पदवीधर नाशिक आमदार डॉ.सुधीर तांबे, अधिवेशन अध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड, आशाताई गायकवाड, शहाद्याचे नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, पुष्पदंतेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष दिपक पाटील, नंदुरबार तालुका विधायक समितीचे व्हा.चेअरमन मनोज रघुवंशी, स्वागताध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत, ईलाताई गावीत, आदिनाथ थोरात, विजयसिंह गायकवाड, सुभाष माने, जे.के.पाटील, ज्ञानेश्वर म्हात्रे, के.बी.पाटील, श्रीपतभाई पटेल, कुबडे सर, अरुण थोरात, मुकेश पाटील, पुष्पेंद्र रघुवंशी, कुंदन पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@