किरकोळ घसरणीसह शेअर बाजार बंद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Nov-2018
Total Views |
 

मुंबई : आठवड्याच्या तिसऱ्या सत्रात बुधवारी शेअर बाजार किरकोळ घसरणीसह बंद झाला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स अडीच अंशांनी घसरून ३५ हजार १४२ वर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी सहा अंशांनी घसरुन १० हजार ५७६ वर बंद झाला.  

 

रुपयाच्या मजबूतीमुळे आयटी आणि फार्मा शेअर घसरले. ऑटो, मेटल, रियल्टी क्षेत्रातही घसरण नोंदवण्यात आली. कच्च्या तेलाच्या दरांमध्ये घसरण झाल्याने एचपीसीएल, बीपीसीएल या तेल कंपन्यांच्या शेअरमध्ये चार टक्क्यांनी घसरण नोंदवण्यात आली. तिमाही निकालांच्या पाश्वभूमीवर .३६ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली. 

 

मोठ्या शेअर्सपैकी मारुति, एशियन पेंटस, ओएनजीसी, एसबीआय, एचयुएल, आयसीआयसीआय बॅंक, भारती एअरटेल, एचडीएफसी, कोल इंडिया आदी शेअर वधारले. टीसीएस, महिंद्र एण्ड महिंद्रा, टाटा मोटार्स, विप्रो आदी शेअर्समध्ये घसरण नोंदवण्यात आली. मिडकॅपमध्ये तेजी दिसून आली तर स्मॉल कॅप शेअर घसरणीसह बंद झाले. बीएसई मिडकॅप .१९ टक्क्यांनी वधारुन १४ हजार ८८२ वर बंद झाला. निफ्टी मिडकॅपमध्ये .०३ टक्के घसरण झाली. बीएसई स्मॉलकॅप .२१ टक्क्यांनी घसरुन बंद झाला.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@