इस्त्रोची गगनचुंबी उंच भरारी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Nov-2018
Total Views |


 
 
 
 

GSAT – 29 हा आजवरचा सर्वात वजनदार भारतीय उपग्रह

 

आंध्रप्रदेश : श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून इस्त्रोने GSAT – 29 या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. आतापर्यंतचा हा सर्वात वजनदार भारतीय उपग्रह आहे. तब्बल ३,४२३ किलोग्रॅम एवढे त्याचे वजन आहे. अत्यंत अत्याधुनिक आणि प्रभावशाली परिणाम देणारा हा इस्त्रोचा दळणवळण उपग्रह आहे. GSLV- MK-III D2 या प्रक्षेपक यानाद्वारे या उपग्रहाचे अवकाशात प्रक्षेपण करण्यात आले.

 

येत्या चार वर्षांत चांद्रयान – २ आणि मानवी अंतराळ मोहिमादेखील इस्त्रो यशस्वी करणार आहे. जम्मू काश्मीर आणि ईशान्य भारतातील दळणवळणाचा विकास करण्यासाठी GSAT – 29 या उपग्रहाचे अंतराळात प्रक्षेपण करण्यात आले आहे. पुढील दहा वर्षांसाठी हा उपग्रह अंतराळात कार्यरत राहील.

 

GSAT – 11 आणि GSAT – 20 या दोन उपग्रहांचे प्रक्षेपण इस्त्रो लवकरच करणार आहे. येत्या डिसेंबर महिन्यात GSAT – 11 या उपग्रहाचे प्रक्षेपण केले जाईल तर GSAT – 20 या उपग्रहाचे प्रक्षेपण पुढच्या वर्षी करण्यात येणार आहे. GSAT – 29 या उपग्रहाचे प्रक्षेपण करताना S200 बूस्टर प्रज्वलित करण्यात आला. S200 बूस्टर हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा बूस्टर आहे.

 
 
     माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/  
@@AUTHORINFO_V1@@