एक ध्यास शिक्षणाचा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Nov-2018   
Total Views |

 


 
 
 

जय मल्हार सामाजिक सेवा संस्था, कल्याण

 

शिक्षण ही गरज माणसाच्या बौद्धिक क्षमतेसाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यावरच मनुष्य जातीचे पुढील भविष्य अवलंबून आहे. या मूळ तत्त्वावर कल्याणमधील ‘जय मल्हार सेवा संस्था’ अनेक वर्षे काम करीत आहे. आज बालदिनाच्या निमित्ताने या संस्थेच्या कार्याचा घेतलेला हा आढावा...

 

जय मल्हार सेवा संस्था’ या संस्थेचे अध्यक्ष दामोदर पांढरे हे आय.टी. उद्योजक आहेत. स्वत:च्या घासातील एक घास कोणालातरी सहज देता यावा, या उद्देशाने ते गेली अनेक वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. लहानपणापासून सामाजिक कार्याची ओढ असणाऱ्या पांढरेंनी ऑक्टोबर २०१५ सालीजय मल्हार सेवा संस्था’ अधिकृतरीत्या नोंदणीकृत केली. १९९२-९३ काळात मुलींची लग्न होणे म्हणजे आई-वडिलांसाठी सर्वात मोठा काळजीचा विषय होता. अशा अविवाहीत मुलींसाठी तसेच मुलांसाठी वधू-वर मेळावे भरविणे, असे उपक्रम त्यांनी राबविले. तसेच समाजातील आर्थिक विवंचना असणाऱ्या लोकांसाठी या संस्थेची निर्मिती करण्यात आल्याचे पांढरेंनी सांगितले.

 

कल्याणमधील साठे नगर वसाहतीतील समस्यांचा पाढा कल्याण-डोंबिवलीकरांसाठी काही नवा नाही. इथे राहणाऱ्या कचरावेचणाऱ्या परिवारांना शिक्षणाचा अर्थ समजाविण्यासाठी मागील कित्येक वर्षे ही संस्था काम करीत आहे. कचरा वेचणाऱ्याचा मुलगा कचरावेचक बनू नये, असा ध्यास पांढरे यांनी घेतला आहे. येथे होणारे बालविवाह रोखण्यासाठी येथील मुलींना शिक्षणाचा अर्थ समजावून सांगण्याचा प्रयत्न ते आणि त्यांच्या संस्थेचे सदस्य करीत आहे. समाजातील शिक्षित मुलींवरही अन्याय होतात. त्यातून बाहेर पडणे हे त्यांच्यासाठी सहज शक्य नसते. मग, अशा परिस्थितीतून या वसाहतीतील अशिक्षित मुली कशा बाहेर पडणार, यासाठी काम करणे गरजेचे असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

 

या संस्थेत काही निवृत्त शासनाचे अधिकारी कार्यरत असून, ते या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम करीत आहेत. आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड शेजारी असणारी साठे नगर वसाहत ही बहुतांश कचरावेचक लोकांची आहे. त्यामुळे इथे असणारे वायुप्रदूषण लक्षात घेत त्यासाठी काम करणे आवश्यक असल्याचे त्यांच्या लक्षात आले. सामाजिक उत्सव साजरा करणाऱ्या सामाजिक कार्याचे आयोजन करून सामाजिक एकत्रीकरण आणि समाजातील प्रतिष्ठेचा प्रचार करणे, शिक्षित बेरोजगार महिला आणि गरीब मुलांच्या विकासासाठी प्रयत्न करणे, वैयक्तिक कौशल्य वाढविण्यासाठी आणि अतिरिक्त अभ्यासक्रमाच्या माध्यमातून संधी देण्याकरिता शैक्षणिक संस्थांमध्ये सामाजिक कार्ये आयोजित करणे, गरीब वर्गांतील लोकांच्या कल्याणाशी संबंधित विविध उपक्रमांची अंमलबजावणी करणे, विविध शासन योजनांविषयी जागरूकता निर्माण करणे, गरीब शैक्षणिक विद्यार्थ्यांना वर्दी, पुस्तके आणि शालेय साहित्य पुरवण्यासाठी उच्च शिक्षणाचा प्रचार करण्यासाठी शिष्यवृत्ती, अंगणवाडी, प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, पिछाडीच्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण संस्था अशा शैक्षणिक कार्यक्रमांची स्थापना करणे, जागरूकता कार्यक्रम आयोजित करणे आणि सामाजिक कॅम्पिंग, पथनाट्य आणि इतर कार्यक्रमांद्वारे निधी उभारणे, गरीब कुटुंबांना कार्यक्रमांचे नियोजन, रक्तदान, औषधांची मुक्त वितरण, चकत्या, चालक इ. ची व्यवस्था करणे, महिलांसाठी स्वयंरोजगार आणि समूह-रोजगार प्रोत्साहन आणि त्यांच्या उत्पादनांचा प्रचार करण्यासाठी तांत्रिक प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करणे, मुलांच्या योग्य विकासासाठी संधी पुरवण्यासाठी विविध बाल विकास प्रकल्पांचे आयोजन करणे, मुलांच्या बौद्धिक, मानसिक आणि शारीरिक विकासासाठी पौष्टिक आहारासाठी विविध योजना लागू करणे.

 

आरोग्य शिबिरे

 

आदिवासी पाड्यात जाऊन त्यांची शरीर तपासणीसाठी शिबिरे आयोजित केली आहेत आणि आरोग्य परिस्थिती सुधारण्यासाठी औषधे वितरीत केली आहेत. रक्तदान मानवजातीसाठीची सेवा आहे. रक्तदान करून आपण गरजूंना मदत करता आणि त्यांचे मौल्यवान आयुष्य वाचवितो. जेएमएसएस मुंबई जवळील अनेक रक्तपट्ट्यांकरिता रक्तदान शिबिरांचे आयोजन करते. शिक्षण हे जगातील सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे, जे आपण जगास बदलण्यासाठी वापरू शकता. शिक्षण भविष्यासाठीचा पासपोर्ट आहे. उडायला जे तयार आहेत त्यांच्यासाठी हे शिक्षण आहे. ज्ञान गुंतवणुकीमध्ये सर्वोत्तम व्याज दिले जाते. आर्थिक मदत, शैक्षणिक कीट आणि शाळेपासून दूर असलेल्या शाळांसाठी समर्थन प्रदान करते.

 

‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ असा नारा सर्वत्र दिला जातो खरा पण, त्याचे नेमके काय होते हे पाहणेही तितकेच औत्स्युक्याचे असेल. मात्र, याला अपवाद ठरत ‘जय मल्हार सामाजिक संस्थेने घरेलू कामगार आणि मोलमजुरी करणाऱ्या परिवारातील चार मुलींचे शैक्षणिक पालकत्व घेऊन त्यांच्या शिक्षणाची पाऊलवाट सुकर केली आहे. त्या कल्याणमधील वाडेघर परिसरातील राहणाऱ्या आहेत. आर्थिक परिस्थिती नसल्याने त्यांना शाळेचे शुल्क भरणेही शक्य नसल्याने त्यांनी या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. शशांक माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक दिगंबर शेवाळे यांचाही या मुलींना शिक्षण मिळवून देण्यात मोलाचा सहभाग आहे. या शाळेतील ८० ते ९० टक्के विद्यार्थी आणि विद्यार्थिनी गरीब कुटुंबातील आहेत. साठे नगर, डॉ. बाबासाहेब आंबडेकर नगर, सम्राट अशोक नगर येथील बहुतांश मुले या शाळेत शिकतात. त्याची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने या विद्यार्थ्यांना संस्थेच्यावतीने मदतीचा हात पुढे केला जातोदहावीच्या परीक्षेनंतर विद्यार्थी व विद्यार्थिनींना रोजगाराच्या निमित्ताने मोफत प्रशिक्षण कार्यशाळाही राबविली जाणार आहे. चांगल्या सवयी, नैतिक मूल्ये, संस्कृती, आत्मविश्वास वाढविण्याच्या पद्धती आणि उपरोक्त उपक्रमांसाठी देशभरात केंद्र तयार करण्यासाठी कार्यशाळा आणि शिबिरे आयोजित करतात. या सर्व कामांसाठी लागणारी आर्थिक बांधाबांध पांढरे स्वखर्चाने करीत आहेत.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@