मोदीच ग्रेट! थलायवानेही केले मान्य

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Nov-2018
Total Views |

 


 
 
चेन्नई : राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच ग्रेट असल्याचे दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी मान्य केले आहे. “जर दहा पक्ष मिळून एका व्यक्तिविरोधात जर एकजूट करत असतील तर कोण अधिक शक्तिशाली आहे हे आपोआपच समजून येते.” असे वक्तव्य रजनीकांत यांनी केले आहे. सध्याच्या भारतीय राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच शक्तिशाली असल्याचे रजनीकांत यांनी मान्य केल्याचे या वक्तव्यावरून दिसून येते.
 

रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा केल्यापासून तामिळनाडूतील राजकीय स्थिती बदलणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. सिनेसृष्टीतील हा थलायवा पंतप्रधान मोदींना साथ देणार की महाआघाडीत सामील होणार? याबाबत अनेक शक्यता वर्तविण्यात येत होत्या. परंतु कोणाला साथ द्यायची याबाबत आपली भूमिका रजनीकांत यांनी अद्याप स्पष्ट केलेली नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@