खेड्यातील मुलांचा ‘वाचनदूत’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |
 
 

मुले ही देवाघरची फुले असतात, असे म्हणतात. याच मुलांच्या संगोपनासाठी त्यांच्यात वाचनाची गोडी निर्माण करणार्‍या चिमुरड्यांच्या पुस्तकवाला सूर्या प्रकाश राय भय्याची बालदिनाच्या निमित्ताने ही खास ओळख...

 
 

वाचाल तर वाचालहा सुविचार आपण नेहमीच वाचतो, ऐकतो. कारण, मुळातच भारतीय शिक्षण पद्धतीत वाचनाला फार महत्त्व आहे. परंतु, हल्ली स्मार्टफोनच्या जमान्यात हीच वाचनाची आवड हळूहळू लोप पावत चालली आहे. त्यातसुद्धाग्रंथालयम्हटलं की, सगळ्यांच्या कपाळाला अगदी आठ्याच पडतात. त्यामुळे मुलांच्या मनात वाचनाची गोडी जर निर्माण करायची असेल, तर लहानपणापासूनच मुलांवर वाचनाचे संस्कार झाले पाहिजे. पण, आजही भारतात अशी ही बरीच गावं आहेत, जिथे मुलांच्या हातात पुस्तक देता, नांगर आणि कुदळ दिले जाते आणि मुलींच्या हाती येते ती चुलीची फुंकणी. पण, अशाच ग्रामीण मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करून बिहार, झारखंड, महाराष्ट्र, मध्य प्रदेश यांसारख्या राज्यांतील असंख्य मुलांची पावले मजुरीकडून वाचनालयाकडे वळविणारापुस्तकवाला भैय्याम्हणजे सूर्या प्रकाश राय. बिहारमधील छोट्या गावातून मोठी स्वप्नं उराशी बाळगून आलेल्या सूर्याने आयआयटी मुंबईमधून आपले शिक्षण पूर्ण केले आणि चांगल्या पगाराच्या कंपनीत तो रुजूही झाला. पण, त्याचं मन रमायचं ते पुस्तकांमध्ये. ‘पुस्तकी किडाकाय ते म्हणतात ना त्यातलाच हा एक किडा. आपण समाजात वावरताना जेवढं समाजकडून घेतो, तेवढं आपणही समाजाचं काही देणं लागतो आणि मग आपल्यामुळे चार मुलं शिकली, तर दुसरं पुण्य ते कोणतं? याच विचाराने सूर्याने हा वाचनाचा रथ ओढण्यास सुरुवात केली. त्याच्या याच प्रयत्नांतून त्याने २०१५ सालीप्रयोगया वाचनालयाची स्थापना केली. ‘शिक्षण हे वाघिणीच्या दुधासारखे आहे. ते जो पितो तो माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे. म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार गुणवत्तेचे असावे,’ असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी सांगतं. पण, आपली नोकरी सोडून केवळ या विचाराने ही अशी उडी घेण्याची आर्थिक परिस्थिती या सूर्याची नव्हती. त्यामुळे सुरुवातीला त्याने इतर सामाजिक संस्थांसोबत काम करण्यास सुरुवात केली. या कामादरम्यान, देशातील असंख्य खेडोपाडी तो फिरला आणि त्याला खेड्यांमधील वास्तव पाहून मनोमन वेदना झाल्या. यातच बिहारमधील गोपाळगंज भागात फिरत असताना सूर्याला विजय कुमार चव्हाण नावाचा एक पुस्तकवेडा भेटला. वयाच्या पंधराव्या वर्षी विजय बिहार सोडून बालमजुरीसाठी लुधियानाला पोहोचला होता. मात्र, तिकडे त्याचे मन रमेना. म्हणून तो परत आपल्या गावी आला आणि त्याने आपलं शिक्षण सुरू केलं. याच सगळ्या प्रवासात प्रकाश आणि सूर्याची भेट झाली आणि त्यानंतर प्रकाशहीप्रयोगच्या या अनोख्या प्रयोगात सामील झाला.

 
 

प्रयोगच्या माध्यमातून आतापर्यंत त्यांनी १२ गावांतील चार हजारांहून अधिक मुलांमध्ये पुस्तकांची गोडी निर्माण केली. मात्र, मुलांना वाचनालयापर्यंत घेऊन येणे हेच मोठ्या कष्टाचे काम होते. कारण, खेड्यातील पालकांसाठी मुलगा हा मजुरीसाठी आणि मुली या स्वयंपाकघरासाठीच असतात, असा प्रचलित विचार. या विचारसरणीतून मुलांना बाहेर काढणे, सूर्या आणि प्रकाशसाठी कठीण होते. याकरिता त्यांनी मुलांसाठी वाचनालयात विविध खेळांचे आयोजन केले. त्यात कबड्डी, लंगडी ते फुटबॉल, क्रिकेट असे सगळे खेळ होते. या खेळांमुळे सुरुवातीला वाचनालयात एक-दोन मुलं खेळायच्या उद्देशाने यायची खरं; पण पुस्तकं पाहून परतही जायची. या संघर्षातच सूर्याने मुलांसाठीसंध्याकाळचा खाऊहे अभियान चालू केले. पालक मुलांना संध्याकाळचा नाश्ता मिळेल या उद्देशाने तरी त्यांना वाचनालयात पाठवू लागले आणि मुलांना पुस्तकांच्या रुपात खाऊ मिळू लागला. सुरुवातीला स्वखर्चाने सूर्या आणि प्रकाश पुस्तकं विकत आणत. पण, हळूहळूप्रयोगसंस्थेसाठी पुस्तकरुपी देणग्याही येऊ लागल्या. यात संत, विचारवंत यापासून साने गुरुजींची हिंदीतील पुस्तके, मासिकं, पेपर यातून या वाचनालयाचे कधी ग्रंथालय झाले कळलेच नाही. या यथाबद्दल सूर्या सांगतो की, ”वाचन हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. वाचनामुळे व्यक्ती बौद्धिकदृष्ट्या सशक्त होते. याच उद्देशाने हा प्रयोग सुरू केला होता. आता हाचप्रयोगइतर राज्यांमध्येही सुरू केलेला आहे.” सध्याप्रयोगया संस्थेचा विस्तार फक्त भारतापुरता मर्यादित राहिला नसून, आता भूतान आणि अमेरिकेतूनही या वाचनालयाला पुस्तके भेट दिली जातात. सूर्या आणि प्रकाश यांनी आता वाचनालयाबरोबरच मुलांसाठी अभ्यासवर्गही सुरू केला आहे. त्यामुळे गोपाळगंज भागातील मुलं सध्या शाळेपेक्षा आपला वेळप्रयोगच्या अभ्यासिकेतच घालवतात. आज ही मुलं रोज विविध पुस्तकं वाचतात. खरं तर मुलांमध्ये वाचनाचे संस्कार हे बालवयातच झाले पाहिजे, या संस्कारातूनच खरा बालदिन साजरा होईल...

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@