पाचोरा शहरात पाईपलाईन फुटल्याने पाण्याचा अपव्यय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Nov-2018
Total Views |

पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष, मुख्याधिकार्‍यांनी लक्ष देण्याची गरज


पाचोरा, 12 नोव्हेंबर
शहरातून सध्या चौपदरी रस्त्याचे काम सुरू आहे. पाचोरा शहरातील महामार्गाच्या दोन्ही बाजूला सध्या रस्त्याचे पोकलँड व जेसीबीने खोदकाम केले जात आहे.
 
जमिनीखाली पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन, वायर किंवा कुठल्याही लहान मोठे केबल असो याची पर्वा न करता बेधडकपणे काम सुरू आहे. या रस्त्याच्या कामामुळे पाचोरा शहरात पाणीपुरवठा असलेली पाईपलाईन फुटल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे.
 
विजय मोटर्स, कृष्णापुरी चौफुली, बालाजी ट्रान्सपोर्ट, साईनाथ मार्बलसमोर तूटफूट झाल्याने रस्ते जलमय झाले आहेत. गिरणेचे पिण्याचे पाणी बहिरम नाल्यात वाहत आहे.
 
मागील महिन्यात शहरवासीयांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागला आहे. दिवाळीदरम्यान आ. किशोर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन भीषण पाणीटंचाई पाहता नगरपरिषदेतर्फे पिण्याच्या पाण्याचा जार घरोघरी वाटप केला होता.
 
गिरणाचे आवर्तन आल्यानंतर सध्या पिण्याचे पाणी जागोजागी मोठ्या प्रमाणात वाया जात आहे. पाणीपुरवठा अजूनही सुरळीत होऊ शकलेला नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
 
पाचोरा शहराला पाणीपुरवठा करणारी सर्व लाईन ठिकठिकाणी फुटली असून त्यामुळे सर्व पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. तसेच नवगज्या पूल, विजय मोटर्स, कोयला डेपो, भारत डेअरी चौफुली दोन ठिकाण, साई मार्बल, चौदा इंची व आठ इंची पाईपलाईन फुटली असून न.पा.कर्मचारी युद्ध पातळीवर कामाला लागले आहेत.
 
मात्र, परिस्थिती जैसे थे आहे. नगरपालिकेचे मुख्याधिकारी सोमनाथ आढाव व पाणीपुरवठा विभाग या कंपनीविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी जोर धरत आहे.
@@AUTHORINFO_V1@@