शेतकर्‍यांना मिळणार सिंचनासाठी वाघूरचे पाणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Nov-2018
Total Views |



 
जळगाव, 12 नोव्हेंबर
वाघूर धरण लाभधारक सिंचन समितीने धरण शेतकर्‍यांच्या हक्काचे असल्याने त्यातील पाणी शेतीसाठी राखीव ठेवण्याबाबत जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्याकडे मागील महिन्यात निवेदन सादर केले होते.
 
त्याअनुषंगाने धरणातील आरक्षित पाणी साठा लक्षात घेता जळगाव नगरपालिकेने डाऊन स्किममधून पाणी घेतल्यास धरण लाभधारक शेतकर्‍यांना पाणी देणे शक्य होणार असल्याचे वाघूर धरण विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी जिल्हा अधिकार्‍यांना दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
 
सध्या या धरणाची नदी विमोचकावरील पाणीपातळी व सध्याची पाणीपातळी यातील एकूण साठा 165.836 नमुद करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना या धरणाचे पाणी उपलब्ध झाल्यास मोठा दिलासा मिळणार आहे.
 
यासाठी वाघूर लाभधारक सिंचन समिती अध्यक्ष लालचंद पाटील, मिलींद चौधरी, राजेंद्र चौधरी, धनराज कोल्हे, शंकर शिंदे यांनी जिल्हाधिकार्‍यांना यापूर्वी निवेदन देऊन पाठपुरावा केला. त्याला यश मिळाले आहे.
@@AUTHORINFO_V1@@