भुसावळला राज्यस्तरीय कोळी समाज वधू-वर परिचय मेळावा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Nov-2018
Total Views |

400 इच्छुक युवक - युवतींनी दिला परिचय; मान्यवरांची उपस्थिती

भुसावळ, 12 नोव्हेंबर
येथील गजानन महाराज नगरातील कोळी समाज मंगल कार्यालयात 11 रोजी कोळी समाज विकास मंडळाच्या वतीने वधू - वर आणि पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भागवत सपकाळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून दिवाकर पाटील, समाजसेवक सतीश सपकाळे, वसंत मोंढे, गिरधर कोळी, रामदास कोळी, व्ही. पी. कोळी, गोपाल तायडे, अरुण कोळी, अरुण सुर्यवंशी, शांताराम बुटे, निलेश पाटील, पन्नालाल सोनवणे, सुधाकर कोळी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी महर्षी वाल्मिक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
 
मंडळाचे पदाधिकारी व सदस्यांनी मान्यवरांचे स्वागत केले. वधू - वर परिचय समितीचे अध्यक्ष भागवत सपकाळे यांनी प्रास्ताविकात आजपर्यंत घेतलेल्या मेळाव्यांची माहिती सांगून वधू - वर परिचय मेळाव्याचे महत्व आणि काळाची गरज यावर प्रकाशझोत टाकला.
 
तसेच कोळी समाज विकास मंडळांतर्गत घेण्यात येणाछया विविध कार्यक्रमांची माहिती सांगितली. प्रमुख पाहुणे जि. प. सदस्य प्रभाकर सोनवणे यांनी विचार मांडले.
 
मुलींनी नोकरीच्याच मुलांची अपेक्षा न ठेवता उद्योजक, शेतकरी यांच्याही अपेक्षा ठेवाव्यात, समाजात वाढत असलेल्या हुंडा पद्धती, साखरपुडा, मानपान या गोष्टीला फाटा द्यावा, असे त्यांनी यावेळी सुचविले. वसंत मोंढे यांच्यासह चंद्रकांत सुर्यवंशी यांनी मुला - मुलींमधील होणारे वाद व त्यामुळे होणारे घटस्फोट टाळण्यासाठी काय करता येईल, यावर मार्गदर्शन केले.
 
परिचय मेळाव्यात 252 मुली, 175 मुले यांनी आपला परिचय दिला. मंडळाचे सहसचिव चंद्रकांत सुर्यवंशी यांनी पुढील काळात घेण्यात येणार्‍या विविध घेण्यात येणाछया विविध उपक्रमांची माहिती सांगितली.
 
वधू - वर परिचय मेळावा यशस्वीतेसाठी समितीचे अध्यक्ष भागवत सपकाळे, कार्यकारी अध्यक्ष दिपक सोनवणे, महारु पिंपरीकर, लिलाधर सपकाळे, शांताराम कोळी, दत्तात्रय सपकाळे, उत्तम कोळी, रोहिदास सोनवणे, डॉ. दिपक कोळी, दिपक सपकाळे, प्रकाश कोळी, हेमंत कोळी, नारायण भोलाणकर, नारायण कोळी, शशिकांत सपकाळे, सुखदेव चित्ते, प्रमोद कोळी, मुकेश कोळी, चंद्रकांत सपकाळे यांच्यासह कोळी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सोनवणे, उपाध्यक्ष नितीन सोनवणे, सचिव वसंत सपकाळे, सहसचिव चंद्रकांत सुर्यवंशी, खजिनदार अभिमन्यु सोनवणे, प्रकाश सपकाळे, सदस्य अर्जुन सपकाळे, दिलीप कोळी, लखीचंद बाविस्कर, बन्सी मोरे, वसंत मोरे, रविंद्र बाविस्कर, विजय तावडे, धर्मराज तावडे यांच्यासह समाजबांधवांचे सहकार्य लाभले.
@@AUTHORINFO_V1@@